अमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानतळावर भव्य स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 02:54 PM2021-09-26T14:54:01+5:302021-09-26T14:58:44+5:30

PM Narendra Modi America visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावरुन परत आले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

After returning from the US, Prime Minister Narendra Modi received a grand welcome at the airport | अमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानतळावर भव्य स्वागत

अमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानतळावर भव्य स्वागत

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावरुन आज दिल्लीला परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळाबाहेर मोठी गर्दी जमकली होती. ढोल-ताशांसह नरेंद्र मोदींचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी पंतप्रधान मोदींची मैत्री नवीन नाही, त्यांचे जुने नाते आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही त्याचाच पुनरुच्चार केला.

स्वागतासाठी जय्यत तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावरुन परत आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेरही जय्यत तयारी करण्यात आली होती. लोक ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी उभे होते. पंतप्रधान मोदी बुधवारी अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर वॉशिंग्टनला गेले होते, तर शुक्रवारी अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली. यासह, त्यांनी क्वाड ग्रुपच्या परिषदेतही भाग घेतला. आपल्या भेटीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 76 व्या सत्रालाही संबोधित केलं.

अक्षय कुमारचा वर्दीतला फोटो पाहून नाराज झाले IPS अधिकारी, अक्षय म्हणाला...

भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी दहशतवाद, कोरोना, संयुक्त राष्ट्राची विश्वासार्हता यासह विविध मुद्द्यांचा उल्लेख केला. त्यांनी अफगाणिस्तानबद्दवरही भाष्य केलं. अफगाणिस्तानची माती दहशतवाद आणि दहशतवादी हल्ले पसरवण्यासाठी वापरली जाणार नाही, याची खात्री करण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले. 

कोरोना लसीकरणात निष्काळजीपणा, 6 कोटी नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस

चीन आणि पाकिस्तानवरही निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जे देश दहशतवादाचा राजकीय साधन म्हणून वापर करत आहेत, त्यांना हे समजले पाहिजे की दहशतवाद त्यांच्यासाठी तितकाच मोठा धोका आहे. अफगाणिस्तानची माती दहशतवाद आणि दहशतवादी हल्ले पसरवण्यासाठी वापरली जात नाही याची खात्री करणे फार महत्वाचे आहे. आपण सावध असले पाहिजे की, कोणताही देश तिथल्या नाजूक परिस्थितीचा आपल्या स्वार्थासाठी साधन म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करत नाही.

जादूटोण्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातील 3 जणांची हत्या, आरोपी अटकेत

मला देशाचा अभिमान
मोदी पुढे म्हणाले, भारत सर्वात मोठी लोकशाही आहे.  भारताच्या लोकशाहीची ही ताकद आहे की, रेल्वे स्टेशनवर आपल्या वडिलांसोबत चहा विकणारा एक साधारण मुलगा आज भारताचा पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा UNGA ला संबोधित करत आहे. मी या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याचा मला अभिमान आहे, असंही ते म्हणाले.

Web Title: After returning from the US, Prime Minister Narendra Modi received a grand welcome at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.