'अग्निपथ' आंदोलकाने पंजाबचे मुंख्यमंत्री भगवंत मान यांची SUV रोखली; बघा मग काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 04:41 PM2022-06-19T16:41:00+5:302022-06-19T16:43:17+5:30
या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री मान रोडशोदरम्यान लोकांना अभिवाद करताना दिसत आहेत. ते आपल्या प्रोटेक्टेड एसयूव्हीच्या सनरूफमध्ये उभे असल्याचे दिसत आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) हे पंजाबच्या संगरूरमध्ये पोटनिवडणुकीसाठी रोड शो करत असताना, अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या एका तरुणाने त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर सीएम भगवंत मान यांनी त्यांची एसयूव्ही कार थांबवली आणि आंदोलक तरुणाशी हस्तांदोलन करत चर्चा केली.
आम आदमी पार्टीने (AAP) या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यात दिसत आहे, की 'अग्निपथ' योजनेला विरोध करणारा तरुण मुख्यमंत्री मान यांच्याशी बोलण्यासाठी त्यांना आवाज देतो. यानंतर ते आपला ताफा थांबवतात. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री मान रोडशोदरम्यान लोकांना अभिवाद करताना दिसत आहेत. ते आपल्या प्रोटेक्टेड एसयूव्हीच्या सनरूफमध्ये उभे असल्याचे दिसत आहे. तेव्हाच एक काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला तरुण त्यांच्याकडे पाहून हात हालवत, त्यांच्याशी बोलण्याची विनंती करतो.
यानंतर लगेचच भगवंत मान त्यांचा ताफा थांबवतात आणि संबंधित तरून मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे धाव घोतो. हा तरुण मान यांच्यासोबत हस्तांदोलन करतो आणि 'अग्निपथ' योजना लागू करण्यापूर्वी सर्व नेतांनी भेटायला हवे आणि यावर चर्चा करायला हवी, असे सांगतो. या दरम्यान मुख्यमंत्री मान गाडीच्या रुफ वरून आंदोलकाचा हात पकडून ऊभे होते. ते म्हणाले, "जर सर्व खासदार 'अग्निपथ'वर चर्चा करण्यासाठी एकत्रित येणार असतील, तर मी व्यक्तीगतपणे तेथे जाईन."
The reason why Punjab loves @BhagwantMann ❤️
— AAP (@AamAadmiParty) June 19, 2022
Punjab CM STOPPED his roadshow for #SangrurBypoll to listen to a youth protesting against #AgnipathSchemepic.twitter.com/PVXiTU0MYI
तत्पूर्वी, सैनिकांना भाड्याने ठेवले जाऊ शकत नाही, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले होते. तसेच केवळ 21 व्या वर्षी आपण या तरुणांना माजी सैनिक कसे करू शकतो? असा सवालही त्यांनी विचारला होता. "सैनिक कठीण परिस्थितीत देशाची सेवा करतात. राजकारणी कधीही निवृत्त होत नाहीत. केवळ सैनिक निवृत्त होत आहेत. जनतेलाच सेवेतून निवृत्त केले जाते. आपल्याला भाड्याने सैनिक ठेवण्याची गरज नाही. अग्निपथ योजना मागे घेतली पाहिजे. आम्ही या योजनेचा विरोध करतो. आम्हाला सैन्य भाड्याने नको आहे. आमचे तरुण सैन्यात जाऊ इच्छित आहे, त्यांच्या देशभक्तीचा सन्मान करा. जोपर्यंत ते सक्षम आहेत, तोपर्यंत त्यांना देशाची सेवा करू द्या" असे भगवंत मान यांनी म्हटले आहे.