'भारत पेटणार..', राहुल गांधी खरंच असं म्हणाले? भाजपा नेत्याने शेअर केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 11:35 AM2022-06-19T11:35:19+5:302022-06-19T11:35:53+5:30
Agneepath Scheme: भाजप नेत्याने राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करत, देशातील परिस्थिती बिघडवण्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे.
Agneepath Scheme: केंद्र सरकारच्या नवीन अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. अनेक राज्यांत हिंसक निदर्शने होत आहेत. ट्रेन, बस आणि सार्वजनिक मालमत्ता जाळल्या जात आहेत. या योजनेच्या विरोधात सुमारे 15 राज्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. दरम्यान, भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओद्वारे भाजप नेत्याचा दावा आहे की, देशातील सध्याच्या परिस्थितीची स्क्रिप्ट काँग्रेसच्या चिंतन शिविरात लिहिली गेली आहे.
राहुल यांनी चिंतन शिबिरात भाषण केले
अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओ उदयपूरमधील चिंतन शिविरचा असल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात, 'आता ही लढाई सुरू झाली आहे. येत्या काळात हिंदुस्थान पेटणार.' या काँग्रेस चिंतन शिबिरात शेकडो काँग्रेस नेते सहभागी झाले होते. व्हिडिओ शेअर करताना मालवीय यांनी लिहिले की, 'राहुल गांधींनी काँग्रेसच्या चिंतन शिविरातून देशाला इशारा दिला होता. लंडनमध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. यूपीमध्ये, सैन्यात भरती होत असलेल्या तरुणांच्या तोडफोडदरम्यान, पोलिसांनी अनेक काँग्रेस नेत्यांना अटक केली आहे.'
हिंदुस्तान में आग लगेगी…
— Amit Malviya (@amitmalviya) June 18, 2022
राहुल गांधी ने कांग्रेस के चिंतन शिविर से देश को चेतावनी दी थी, लन्दन में इसी बात को दोहराया।
यूपी में पुलिस ने सेना में भर्ती होने वाले नौजवान बन कर तोड़ फोड़ करने वाले जिन लोगों को गिरफ़्तार किया है उनमें कई कांग्रेस के नेता है।
आग लगायी जा रही है। pic.twitter.com/yh6lWk21RE
राहुल लंडनमध्ये काय म्हणाले?
काँग्रेसच्या चिंतनशिबिरानंतर राहुल गांधी नुकतेच लंडनमध्ये होते. येथे एका परिषदेत भारताबद्दल बोलताना ते म्हणाले होते की, 'भारतात सर्वत्र रॉकेल शिंपडले आहे, एक ठिणगी पेट घेऊ शकते'. राहुल यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. ट्विटरवर लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले. आता त्यांच्या वक्तव्याचा देशातील परिस्थितीशी संबंध जोडला जात आहे.