अहमदाबाद:गुजरातच्याअहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मानसिक आजारी महिलेनं शौचालयात बाळाला जन्म दिला आणि यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, बाळ बाहेर येताच त्याचं डोकं कमोडमध्ये अडकलं. यानंतर अग्निशमन दलातील जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी त्या बाळाचा जीव वाचवला.
अग्नीशमन दलाने वाचवला जीवअहमदाबादमधील महिला संरक्षण विकास गृहात ही घटना घडली आहे. ही मानसिक आजारी महिला याच ठिकाणी राहते. मिळालेल्या माहितीनुसार, महिला टॉयलेटमध्ये गेली होती, यादरम्यान तिला प्रसुती वेदना झाल्या आणि याच ठिकाणी तिनं मुलीला जन्म दिला. पण, मुलगा बाहेर येताच तो कमोडमध्ये पडला आणि त्याचं डोकं त्यात अडकलं. बाळाचं डोकं कमोडमध्ये अडकल्याची माहिती मिळताच, अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी या बाळाचा जीव वाचवला.
मुलगी डॉक्टरांच्या देखरेखीखालीसध्या नवजात मुलगी पूर्णपणे सुरक्षित असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, माहिती मिळताच मुलीला वाचवण्यासाठी टीम घटनास्थळी पोहोचली. कमोडमध्ये पाणी जाऊन बाळाचा मृत्यू होऊ नये, यासाठी शौचालयाच्या फरशा तोडून पाइपलाइन अडवण्यात आली होती. यानंतर अत्यंत सावधगिरीने कमोड तोडून बाळाला बाहेर काढण्यात आले. आता मुलगी पूर्णपणे सुरक्षित असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.