अभिमानास्पद! बाप-लेकीची उत्तुंग भरारी; हवाई दलाच्या इतिहासात केली नेत्रदिपक कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 01:05 PM2022-07-06T13:05:14+5:302022-07-06T13:13:26+5:30
Flying Officer Ananya Sharma : एका बाप-लेकीने केलेल्या कामगिरीची देशभरात जोरदार चर्चा होत आहे. या दोघांनी एकसाथ फायटर जेट उडवून इतिहास रचला आहे.
नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. एका बाप-लेकीने केलेल्या कामगिरीची देशभरात जोरदार चर्चा होत आहे. या दोघांनी एकसाथ फायटर जेट उडवून इतिहास रचला आहे. सैन्याच्या इतिहारास याआधी कधीही कोणत्याही वडिलांनी आपल्या मुलीसोबत विमान उडवलेलं नाही. फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा हिने एअर कमांडर असलेल्या तिच्या वडिलांसोबत उड्डाण केले. त्यांच्या या उत्तुंग भरारीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
अनन्या शर्मा भारतीय हवाईदलात फ्लाइंग ऑफिसर आहे. अनन्याच्या या यशाबाबत तिच्या वडिलांना अभिमान आहे. अनन्या आपल्या वडिलांसोबत फ्लाइंज जेट उडवणारी पहिली महिला भारतीय आहे. या बाप- लेकीच्या जोडीने हवाई दलाचे हॉक-132 विमान चालवून इतिहास रचला आहे. अनन्यासाठीही तिचे वडील प्रेरणास्थान होते. लहानपणापासून ती बाबांचे काम पाहत होती. त्यामुळे मोठं झाल्यावर तीही संजय शर्मा यांच्यासारखं हवाई दलात रूजू होण्याचे स्वप्न पाहू लागली.
AIR COMMODORE SANJAY SHARMA and his daughter ANANYA SHARMA became the first father-daughter pair in the #IndianAirForce to fly in formation of the Hawk AJT in Bidar.
— Vikas Manhas (@37VManhas) July 5, 2022
GLORIOUS PAST PROMISING FUTURE @IAF_MCCpic.twitter.com/HCpAKSmGv3
अनन्याचे वडील एअर कमोडोर संजय शर्मा यांना 1989 मध्ये फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त करण्यात आलं. त्यांना लढाऊ विमानांचा अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांनी मिग 21 स्क्वाड्रनची जबाबदारीही सांभाळली आहे. 2016 मध्ये हवाई दलात पहिली महिला फायटर म्हणून सेवा देणाऱ्या महिलांकडे पाहून तिचा आत्मविश्वास वाढला.
बीटेक पूर्ण केल्यानंतर तिची भारतीय हवाईदलात फ्लाइंग ब्रांचच्या ट्रेनिंगसाठी निवड झाली. अनन्याची डिसेंबर 2021 मध्ये फायटर पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली. 30 मे 2022 रोजी बाप-लेकीच्या जोडीने इतिहास रचला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.