व्हाइस चीफ एअर मार्शल स्वत:च्याच बंदुकीतून सुटलेल्या गोळीनं जखमी; राफेल डीलमध्ये केली होती मोदी सरकारची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 10:43 AM2018-09-27T10:43:00+5:302018-09-28T13:59:09+5:30

भारतीय हवाई दलाचे व्हाइस चीफ एअर मार्शल एसबी देव हे त्यांच्याच बंदुकीतून सुटलेल्या गोळीनं जखमी झाले आहेत.

air force vice chief sb deo accidentally shoots himself in thigh is stable | व्हाइस चीफ एअर मार्शल स्वत:च्याच बंदुकीतून सुटलेल्या गोळीनं जखमी; राफेल डीलमध्ये केली होती मोदी सरकारची पाठराखण

व्हाइस चीफ एअर मार्शल स्वत:च्याच बंदुकीतून सुटलेल्या गोळीनं जखमी; राफेल डीलमध्ये केली होती मोदी सरकारची पाठराखण

googlenewsNext

नवी दिल्ली- भारतीय हवाई दलाचे व्हाइस चीफ एअर मार्शल एसबी देव हे त्यांच्याच बंदुकीतून सुटलेल्या गोळीनं जखमी झाले आहेत. त्यांच्या नकळत बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे मांडीला दुखापत झाली आहे. एअर मार्शल एसबी देव यांना तात्काळ दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी जुलैमध्ये हवाई दलाचे व्हाइस चीफ एअर मार्शलचा पदभार स्वीकारला होता.

खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी कथित वादग्रस्त राफेल घोटाळ्यावर प्रतिक्रिया दिली होती. तसेच राफेल विमानं चांगली असून, यात कोणताही घोटाळा नसल्याचं ते म्हणाले होते. राफेल डीलवरून टीका करणा-यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले होते. राफेलवरून आरोप करणा-यांनी आधी खरेदी प्रक्रिया समजून घ्यावी, असं ते म्हणाले होते. राफेल हे एक सर्वोत्तम विमान असून अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त आहे. हवाई दलात या विमानाचा समावेश झाल्यानंतर भारत स्वतःच्या प्रतिस्पर्धांसमोर हवाई दलाच्या माध्यमातून मोठं आव्हान उभं करू शकतो.



 

Web Title: air force vice chief sb deo accidentally shoots himself in thigh is stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.