आखाती देशांत १ कोटी भारतीय अडकले; नौदलाला युद्धनौका तयार ठेवण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 03:29 PM2020-04-29T15:29:29+5:302020-04-29T15:31:57+5:30

CoronaVirus कोरोना व्हायरसमुळे आखाती देशांमध्ये नोकरी, काम धंद्यासाठी गेलेल्या या लोकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदल तयार असल्याचे सरकारी सुत्रांनी एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले आहे.

Air India, Indian Navy on standby to evacuate stranded 1 crore Indians from Gulf hrb | आखाती देशांत १ कोटी भारतीय अडकले; नौदलाला युद्धनौका तयार ठेवण्याचे आदेश

आखाती देशांत १ कोटी भारतीय अडकले; नौदलाला युद्धनौका तयार ठेवण्याचे आदेश

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे देशांतर्गत विमान वाहतुकीबरोबरच आंतरराष्ट्रीय वाहतूकही बंद करण्यात आली आहे. मात्र, या आधी चीनमध्ये अडकलेल्या शेकडो भारतीयांना देशात आणण्यात आले होते. तसेच युरोप, अमेरिकेच्या भारतात अडकलेल्या नागरिकांना नेण्यासाठी त्या-त्या देशांनी विमाने पाठविली होती. आता आखाती देशांत जवळपास १ कोटी भारतीय अडकले आहेत. 


कोरोना व्हायरसमुळे आखाती देशांमध्ये नोकरी, काम धंद्यासाठी गेलेल्या या लोकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदल तयार असल्याचे सरकारी सुत्रांनी एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले आहे. जर गरज वाटली तर युद्धनौका आयएनएस जलाश्व आणि मगर श्रेणीतील दोन युद्धनौकांना आखाती देशांत पाठविले जाऊ शकते. सरकारने या युद्धनौका तयार ठेवण्यास सांगितल्या आहेत. या बोटींमधून १५०० लोकांना एकावेळी आणले जाऊ शकते.


 आयएनएस जलाश्व सध्या विशाखापट्टनमहून खूप लांब आहे. तर मगर श्रेणीतील युद्धनौका पश्चिमी समुद्रामध्ये तैनात आहेत.  इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, कतार, युएई आणि ओमानसह अन्य खाडी किनाऱ्यावरील देशांना आखाती देश म्हटले जाते. या ठिकाणी जवळपास १ कोटी भारतीय कामगार राहतात. यामध्ये जास्तीत जास्त लोक तेल कंपन्या आणि बांधकाम क्षेत्रात काम करतात. 


एअर इंडियालाही सूचना?
एएनआयला सुत्रांनी दिलेल्य़ा माहितीनुसार एअर इंडियालाही तयारीचे आदेश देण्यात आले आहेत. नौदल आणि एअर इंडियाने तातडीने गल्फ देशांमधील अडकलेल्या भारतीयांना सुखरुप परत आणण्यासाठी एक योजना तयार करावी, असे सांगण्यात आले आहे. यावर एअर इंडिया ५०० विमाने आणि नौदल तीन युद्धनौका तयार ठेवणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. ही योजना सरकारसमोर मांडण्यात येणार असून परवानगी मिळाल्यानंतर लगेचच काम सुरु होणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus चीनने १८४ देशांना नरक बनविले; डोनाल्ड ट्रम्प भडकले

फोर्ड संकटात! तब्बल दोन अब्ज डॉलरचा तोटा; नुकसान पाच अब्जांवर जाण्याची भीती

CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार

देशासाठी काहीपण! आजारी बालकासाठी रेल्वेने १५०० किमींचे अंतर कापत १ लीटर दूध पोहोचवले

 

Web Title: Air India, Indian Navy on standby to evacuate stranded 1 crore Indians from Gulf hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.