अक्षय कुमारनं 'ते' ट्विट गुपचूप डिलीट केलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 09:29 AM2018-05-23T09:29:35+5:302018-05-23T09:29:35+5:30

अक्षय कुमारनं पेट्रोल दरवाढीसंदर्भात केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. या ट्विटवरून अक्षय कुमारला आता नेटिझन्सनी ट्रोल केलंय.

Akshay Kumar Quietly Deletes Old Tweet On Rising Petrol Prices, Twitter Shows Him Receipts | अक्षय कुमारनं 'ते' ट्विट गुपचूप डिलीट केलं, पण...

अक्षय कुमारनं 'ते' ट्विट गुपचूप डिलीट केलं, पण...

Next

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या किमती सातत्यानं वाढतच चालल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता अक्षय कुमारनं पेट्रोल दरवाढीसंदर्भात केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. या ट्विटवरून अक्षय कुमारला आता नेटिझन्सनी ट्रोल केलंय. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर ट्विटरवरून लोकांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्याच वेळी नेटिझन्सना अक्षय कुमारचंही 6 वर्षं जुनं ट्विट सापडलं. त्या ट्विटमुळे अक्षय कुमार ट्रोल झाला आणि त्यानं लागलीच ते ट्विट डिलीट करून टाकलं आहे.

अक्षय कुमारनं जे ट्विट डिलीट केलं ते जवळपास 6 वर्षं जुनं म्हणजे 27 फेब्रुवारी 2012मधलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून अक्षय कुमारनं तत्कालीन यूपीए सरकारवर निशाणा साधला होता. त्या ट्विटमध्ये त्यानं लिहिलं होतं की, पेट्रोलची किंमत ज्या प्रकारे वाढतेय, त्यावरून मला वाटतंय की आता आपल्याला धूळखात पडलेली सायकल साफ करून रस्त्यावर उतरवावी लागणार आहे. अक्षय कुमारच्या या टि्वटमुळे युझर्सही त्याच्यावर तुटून पडले. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल प्रतिलिटर 75 ते 76 रुपयांच्या घरात होते. लोकांनी अक्षयचं हे जुनं ट्विट पाहिल्या पाहिल्याच त्याच्या त्या ट्विटवर प्रश्न उपस्थित केला.


सध्या पेट्रोलच्या किमती 80 रुपयांच्या पार गेल्या आहेत. परंतु अक्षय कुमार त्यावर काहीच बोलत नसल्यानं नेटिझन्सनी नाराजीही व्यक्त केली आहे. त्यानंतर अक्षय कुमारनं लागलीच 6 वर्षं जुनं ट्विट डिलीट केलं. त्यामुळे साहजिकच लोकांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे. अक्षय कुमारनं कोणाला घाबरून ट्विट डिलीट केलं, असा प्रश्नही नेटिझन्सनी आता उपस्थित केला आहे.

तसेच यूपीए सरकारवर टीका करणारी अनेक ट्विटरही याआधी अक्षय कुमारनं केली होती. खरं तर दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा भडका उडत असताना अक्षय कुमारकडून कोणतंही ट्विट अद्याप आलेलं नाही. 2011-12मध्ये पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांनी विरोध प्रदर्शन केलं होतं. परंतु सध्या तरी पेट्रोलच्या वाढत्या किमतींवर कोणत्याही अभिनेत्यानं ट्विट केलेलं नाही.


 

Web Title: Akshay Kumar Quietly Deletes Old Tweet On Rising Petrol Prices, Twitter Shows Him Receipts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.