नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या किमती सातत्यानं वाढतच चालल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता अक्षय कुमारनं पेट्रोल दरवाढीसंदर्भात केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. या ट्विटवरून अक्षय कुमारला आता नेटिझन्सनी ट्रोल केलंय. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर ट्विटरवरून लोकांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्याच वेळी नेटिझन्सना अक्षय कुमारचंही 6 वर्षं जुनं ट्विट सापडलं. त्या ट्विटमुळे अक्षय कुमार ट्रोल झाला आणि त्यानं लागलीच ते ट्विट डिलीट करून टाकलं आहे.अक्षय कुमारनं जे ट्विट डिलीट केलं ते जवळपास 6 वर्षं जुनं म्हणजे 27 फेब्रुवारी 2012मधलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून अक्षय कुमारनं तत्कालीन यूपीए सरकारवर निशाणा साधला होता. त्या ट्विटमध्ये त्यानं लिहिलं होतं की, पेट्रोलची किंमत ज्या प्रकारे वाढतेय, त्यावरून मला वाटतंय की आता आपल्याला धूळखात पडलेली सायकल साफ करून रस्त्यावर उतरवावी लागणार आहे. अक्षय कुमारच्या या टि्वटमुळे युझर्सही त्याच्यावर तुटून पडले. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल प्रतिलिटर 75 ते 76 रुपयांच्या घरात होते. लोकांनी अक्षयचं हे जुनं ट्विट पाहिल्या पाहिल्याच त्याच्या त्या ट्विटवर प्रश्न उपस्थित केला.
अक्षय कुमारनं 'ते' ट्विट गुपचूप डिलीट केलं, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 9:29 AM