म्हणून अल कायदाचे भारतावरील हल्ले फसले....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 03:59 PM2018-08-14T15:59:15+5:302018-08-14T16:00:26+5:30

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात इशारा

al qaida ideologically inclined to do attacks in india | म्हणून अल कायदाचे भारतावरील हल्ले फसले....

म्हणून अल कायदाचे भारतावरील हल्ले फसले....

वॉशिंग्टन : आधीच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाशी चार हात करणाऱ्या भारतावर आत लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेचे हल्ले होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या अहवालामध्ये अल कायदा भारतावर हल्ले करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले आहे. यासाठी अल कायदाचे इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) तयारी करत आहे. 


 अल कायदा आणि आयएसआयएस या दहशतवादी संघटनांनी भारतात आपले पाय पसरवले आहेत. काश्मीरमध्येही वेळोवेळी आयएसआयएसचे झेंडे फडविताना दिसून येतात. भारतासह आशियाई देशांमध्ये हल्ले करण्याची रणनीती या संघटनांनी बनविली आहे. युएनच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, अल कायदा भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नुकतीच वाढविलेली सुरक्षा त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरवत आहे. 


 हा अहवाल युएनच्या अल कायदा सेक्शन समितीला सोपविण्यात आला आहे. युएनचे निरिक्षण पथक आयएसआयएस आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवते व याबाबतचा अहवाल प्रत्येक सहा महिन्यांनी देते. 


अल कायदा भारताच्या सुरक्षा यंत्रणांकडून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहे. सुरक्षा यंत्रणेला त्यावेळी भेदून हल्ला करण्यात येणार आहे. अल कायदा पुर्वीसारखी ताकदवान राहिलेली नसली तरीही ती आशियाई देशांत आपले अस्तित्व टिकवून आहे. तसेच ती भारतात स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीची वाट पाहत आहे.

आयएसआयएल सर्वात खतरनाक
या संघटनेने अफगाणिस्तानातून युरोपमध्ये हल्ले केले होते. काश्मीरमधील एका हल्ल्यातही या संघटनेचा सहभाग होता. सध्या आयएसआयएल अफगाणिस्तानात आपली पाळेमुळे रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतू, त्यांचे पाकिस्तानातही स्लीपर सेल कार्यरत आहेत.

Web Title: al qaida ideologically inclined to do attacks in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.