राफेल घोटाळ्याच्या चौकशीपासून मोदींना कोणीही वाचवू शकत नाही- राहुल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 09:56 PM2019-01-08T21:56:44+5:302019-01-08T21:59:23+5:30
सर्वोच्च न्यायालयानं सीबीआय वि. सीबीआय प्रकरणात निकाल दिल्यानंतर राहुल गांधी आक्रमक
नवी दिल्ली: सीबीआय विरुद्ध सीबीआय वादात सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला दणका दिल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर सरकारनं सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांना पदावरून दूर केलं होतं. मात्र सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचा निर्णय न्यायालयानं दिला. या निकालाचं राहुल गांधींनी स्वागत केलं. राफेल घोटाळ्याच्या चौकशीपासून मोदींना कोणीही वाचवू शकत नाही, असं ट्विट राहुल यांनी केलं.
The truth of Rafale will destroy Mr Modi. It’s only a question of time before full evidence of his role in the theft of 30,000 Cr. becomes public.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 8, 2019
Congratulations to the SC for upholding the law.#AlokVerma
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आता या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतात, त्यावर माझं लक्ष असेल, असं राहुल गांधींनी म्हटलं. सीबीआयचे संचालक असलेले आलोक वर्मा राफेल घोटाळ्याचा चौकशी करणार होते. त्यामुळेच त्यांना रातोरात पदावरून हटवण्यात आलं, असा दावा राहुल यांनी केला. राफेल घोटाळ्यापासून मोदी वाचू शकणार नाहीत, असं काँग्रेस अध्यक्ष म्हणाले.