अमरनाथ दहशतवादी हल्ला - जखमींना एअरलिफ्ट करुन आणणार दिल्लीत
By admin | Published: July 11, 2017 07:55 AM2017-07-11T07:55:28+5:302017-07-11T08:19:35+5:30
अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या 32 यात्रेकरुंना एअरलिफ्ट करुन दिल्लीला आणण्यात येणार आहे
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 11 - अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या 32 यात्रेकरुंना एअरलिफ्ट करुन दिल्लीला आणण्यात येणार आहे. याशिवाय अमरनाथ यात्रेच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नसून आधीप्रमाणे सुरु राहणार आहे. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी ही माहिती दिली आहे. सोमवारी रात्री अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 32 जण जखमी झाले आहेत. जखमींना एअरलिफ्ट केलं जाईल असं निर्मल सिंह यांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या
उपमुख्यमंत्री निर्मल सिंह बोलले आहेत की, "जखमींना रात्रीच श्रीनगरला शिफ्ट करण्यात आलं आहे. यानंतर सकाळी बीएसएफच्या विशेष विमानाने त्यांना दिल्लीला पाठवण्यात येईल. जखमींसोबत मृतदेहही पाठवण्यात येणार आहेत". 2000 नंतर अमरनाथ यात्रेवर झालेला हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता. दहशतवाद्यांनी गुजरातहून आलेल्या एका बसवर निशाणा साधला, ज्यामध्ये बसमधील सहा महिलांसहित सात जणांचा मृत्यू झाला. जखमींना धोका नसल्याची माहिती निर्मल सिंह यांनी मेहबुबा मुफ्तींना दिली आहे. विभागीय आयुक्त मनदीप भंडारी यांनी सांगितलं आहे की, "यात्रेत कोणतीही अडचण येणार नाही. ठरल्याप्रमाणे मंगळवारी यात्रा सुरु राहणार आहे".
It's being investigated by J&K police. Yatra is going on, we will ensure that it goes on peacefully: Zulfiqar Hasan, IG (Operations), CRPF pic.twitter.com/wLd8dZOxhq
— ANI (@ANI_news) July 11, 2017
मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दहशतवादी हल्ल्यावर बोलताना हा सर्व मुस्लिम आण काश्मिरींवर एक डाग असल्याचं म्हटलं आहे. अनंतनाग येथे रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यावर त्यांनी या घटनेमुळे काश्मिरींची मान शरमेने खाली झुकली असल्याचं सांगितलं आहे. "इतक्या अडचणी असतानाही यात्रेकरु दरवर्षी काश्मीरमध्ये येतात. आज सात लोकांचा मृत्यू झाला आहे. माझ्याकडे याचा निषेध करण्याशिवाय दुसरं काही नाही. सुरक्षा जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस कट रचणा-यांना अटक करुन कारवाई करतील अशी अपेक्षा आहे", असं मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत. "ही घटना सर्व काश्मिरी आणि मुस्लिमांवर एक डाग आहे. आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही", असंही त्यांनी सांगितलं आहे.
#WATCH: Jammu and Kashmir Chief Minister Mehbooba Mufti speaks on #Anantnag terror attack targeting #AmarnathYatra pilgrims. pic.twitter.com/SKtcJaK56r
— ANI (@ANI_news) July 10, 2017
जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद
दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अनंतनाग जिल्ह्याच्या एसपी कंट्रोल रुमकडून सूचना देण्यात आल्यानंतर जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.