गॅस सिलिंडर मिळणार 50 रुपयांनी स्वस्त; असे करा Online बुकिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 04:32 PM2020-08-27T16:32:34+5:302020-08-27T16:34:44+5:30
थेंबे थेंबे तळे साचेप्रमाणे प्रत्येक गोष्टीत काही पैसे जरी वाचले तरीही ती मोठी रक्कम ठरणार आहे. दर महिन्या दी़ड महिन्याला गॅस सिलिंडर बुक करावा लागतोच लागतो. आधी यासाठी मोठी लाईन लावावी लागत होती.
कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक स्थिती खालवली आहे. अनेकांची नोकरी गेली आहे, तर अनेकांचा पगार कापण्यात आला आहे. अशावेळी घरातील महत्वाच्या वस्तू जसे की किराणा, दूध, पाणी, गॅस आदींसाठी पैसे तर लागतच आहेत. यामुळे 10 रुपये जरी एखाद्या वस्तूसाठी वाचले तरीही संकटग्रस्त लोकांसाठी ते पुरेसे आहेत. सिलिंडर बुक करताना देखील पैसे द्यावे लागतात. यामध्ये तुम्ही 50 रुपये वाचवू शकणार आहात.
थेंबे थेंबे तळे साचेप्रमाणे प्रत्येक गोष्टीत काही पैसे जरी वाचले तरीही ती मोठी रक्कम ठरणार आहे. दर महिन्या दी़ड महिन्याला गॅस सिलिंडर (Gas Cylinder booking) बुक करावा लागतोच लागतो. आधी यासाठी मोठी लाईन लावावी लागत होती. आता घर बसल्या एक मिसकॉल दिला की गॅस सिलिंडर बुक होतो किंवा सिलिंडर पुरवठादार कंपन्यांचे अॅपही आले आहेत.
सध्या गॅसच्या किंमती कमालीच्या वाढल्या आहेत. एवढ्या की आता काँग्रेसच्या काळात जेवढ्या किंमतीला सिलिंडर मिळत होता त्यापेक्षा जवळपास दुप्पट दर झाला आहे. शिवाय सबसिडीमध्ये आता 8 सिलिंडर मिळतात. बाकीच्या सिलिंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तरीही हे सिलिंडर महाग झाले आहेत. जर तुम्हाला सिलिंडर त्यापेक्षा स्वस्त भावात हवा असेल तर यासाठी एक मार्ग आहे.
जर तुम्ही अॅमेझॉन पे (amazon pay) वरून सिलिंडर बुक केला तर तुम्हाला मोजलेल्या रकमेपैकी 50 रुपये परत मिळणार आहेत. अॅमेझॉन पे वर इंडेन, भारत आणि एचपी गॅस कंपन्या आहेत. तेथून बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 50 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.
जाणून घ्या प्रक्रिया...
- अॅमेझॉन पेच्या पेमेंट ऑप्शनवर जावे लागणार आहे.
- यानंतर गॅस सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी निवडावी लागेल.
- याठिकाणी तुमचा गॅस कंपनीला दिलेला मोबाईल नंबर किंवा एलपीजी नंबर टाकावा लागेल.
- तुमची माहिती आली की अॅमेझॉन पेला लिंक असलेल्य़ा य़ुपीआय किंवा डेबिट कार्डातून पैसे वजा होतील.
- यानंतर काही वेळातच तुमच्या अकाऊंटमध्ये 50 रुपयांचा कॅशबॅक वळता केला जाईल.
- महत्वाचे म्हणजे ही ऑफर 31 ऑगस्टपर्यंत आहे. कंपनी पुढेही ही ऑफर वाढवू शकते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
अमेरिका हबकली! चीनने दक्षिण समुद्रात दोन 'किलर' मिसाईल डागली; युद्धनौका उद्ध्वस्त करण्याची शक्ती
TikTok चे सीईओ केविन मेयर यांचा राजीनामा; अमेरिकेचा मोठा दबाव
सुशांत राजपूत: "तीन महिन्यांपासून सुरु होते Black Magic"; रियाच्या घरी गोंधळ उडाला
Video: जग पुन्हा हादरले! रशियाने सर्वात शक्तीशाली, संहारक अणुबॉम्ब जगासमोर आणला
रेल्वेमध्ये भरती, मुलाखत...; 50 जणांकडून उकळले 1 कोटी
लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कबुली
बडे काम की चीज! LIC ने आणली नवी पॉलिसी; आयुष्यभर देणार उत्पन्न