बंगालमध्ये भाजपाची रथयात्रा रोखल्याने अमित शाह यांचा तीळपापड, ममता बॅनर्जींवर केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:25 PM2018-12-07T16:25:42+5:302018-12-07T16:27:21+5:30
पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत. दरम्यान, भाजपाची रथयात्रा रोखल्याने तीळपापड झालेल्या भाजपा अध्यक्षांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट हल्ला केला असून, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप शाह यांनी केला आहे. बंगालमधील पंचायत निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींची झोप उडाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने रथयात्रेला परवानगी नाकारल्याने भाजपाने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित शाह म्हणाले की, ''बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशामुळे ममता बॅनर्जी बावचळल्या आहेत.'' भाजपाच्या रथयात्रेमुळे राज्यात सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पश्चिम बंगाल सरकारने भाजपाच्या रथयात्रेला परवानगी नाकारली होती.
BJP President Amit Shah on permission for Rath Yatra in West Bengal: A democratic process has been suppressed in West Bengal, with the misuse of power. The CM is following this trend. This is non-democratic. pic.twitter.com/kd4lZh1Zzi
— ANI (@ANI) December 7, 2018
रथयात्रेसाठी आठ वेळा परवानगी मागूनही पश्चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारली. तसेच पंचायत निवडणुकीदरम्यान, भाजपाच्या 20 कार्यकर्त्यांची हत्या झाली. या सर्व हत्यांमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाले. मात्र त्यांचा योग्य तपास झाला नाही, असा आरोपही शाह यांनी केला.
#WATCH: BJP President Amit Shah when asked, 'Rahul Gandhi says PM has not held a single press conference in all these years' says,"Sambit Patra ji jawab denge Rahul ji ka, party ki ore se hi denge." pic.twitter.com/1nsfCHHKKf
— ANI (@ANI) December 7, 2018