राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 06:03 PM2020-08-14T18:03:44+5:302020-08-14T18:07:12+5:30

गेहलोत म्हणाले, विश्वास मतावर बोलण्यासाठी आपल्याकडे बरेच मुद्दे होते. मात्र, आपण त्यावर बोलला नाहीत. कोरोना मुद्द्यावर आपण जी चर्चा केली, त्याचे वाईट वाटते. कोरोना काळात संपूर्ण जग राजस्थानचे कोतुक करत आहे.

Amit shah must have felt the biggest push regarding the rajasthan case said cm ashok gehlot in the assembly  | राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

Next
ठळक मुद्देगेहलोत म्हणाले, प्रत्येक ठिकाणी आपण लोकशाहीला धोक्यात टाकले.आपण चार वर्ष केलेले कट-कारस्तान संपूर्ण देशाने पाहिले आहेया संपूर्ण प्रकरणाचा ज्या पद्धतीने समारोप झाला. त्याचा धक्का देशात कुणाला बसला असेल तर तो अमित शाह आणि आपल्यालाच बसला.

जयपूर - गेल्या काही दिवसांपासून राजस्थानात सुरू असलेला सत्ता संघर्ष आता शमला आहे. आजपासून सुरू झालेल्या राजस्थान विधानसभेत भाजपानेकाँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता. मात्र मुख्यमंत्री अशोक गेहलोत(Ashok Gehlot) यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकत भाजपाला जबरदस्त झटका दिला. यावेळी मुख्यमंत्री गेहलोत यांनी विधानसभेत विरोधी पक्षाच्या प्रश्नांनाही उत्तर दिले. आज विरोधी पक्ष नेते गुलाब चंद कटारिया यांचा नवाच चेहरा बघायला मिळाला, असे म्हणत, मी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावतो, असेही गेहलोत यांनी म्हटले आहे.

गेहलोत म्हणाले, विश्वास मतावर बोलण्यासाठी आपल्याकडे बरेच मुद्दे होते. मात्र, आपण त्यावर बोलला नाहीत. कोरोना मुद्द्यावर आपण जी चर्चा केली, त्याचे वाईट वाटते. कोरोना काळात संपूर्ण जग राजस्थानचे कोतुक करत आहे. पंतप्रधान मोदी म्हणत आहेत, की कोरोनाचा सामना करण्यासाठी इतर राज्यांनी राजस्थानचे अनुकरण करायला हवे. मी तर त्यांना असे काही सांगण्यास सांगितले नाही. भीलवाडा मॉडेलसंदर्भात आम्ही पंतप्रधानांना काही सांगितले नाही.

आपण चार वर्ष केलेले कट-कारस्तान संपूर्ण देशाने पाहिले आहे -
मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले, देशात प्रत्येक राजकीय पक्षातील नेत्यांत पॉलिटिकल डिस्टन्स निर्माण होत राहिले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा ज्या पद्धतीने समारोप झाला. त्याचा धक्का देशात कुणाला बसला असेल तर तो अमित शाह आणि आपल्यालाच बसला. सरकार पाडण्याच्या प्रयत्नात केंद्रातील मोठ-मोठे नेते सहभागी होत, असे वाटते, की त्यांनी तुम्हाला यात सहभागी केले नाही. असेही असू शकते, की आपल्याला याची कल्पनाही नसेल. आपण विरोधी पक्ष नेते आहात. आपण जेवढ्या सफाईदारपणे बोलत आहात ते कळण्या पलिकडचे आहे. फोन टॅपमध्ये समजले आहे, की यात कोणकोणते नेते सहभागी आहेत. मात्र एवढे नक्कीच बोलेन, की आपले स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. आपण गेली चार वर्ष जे कट कारस्तान केले ते संपूर्ण देशाने पाहिले आहे.

'सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को' -
गेहलोत म्हणाले, आपण कर्नाटक, मणिपूर, गोवा आणि मध्य प्रदेशात काय केले? प्रत्येक ठिकाणी आपण काँग्रेसचे आमदार चोरी केले. प्रत्येक ठिकाणी आपण लोकशाहीला धोक्यात टाकले. षडयंत्र करूनही आपण काय-काय म्हणत आहात, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आपली स्थिती तर ' सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को', अशी झाली आहे.

गेल्या 50 वर्षांपासून राजकारण करतोय -
विरोधी पक्ष नेते गुलाब चंद कटारिया यांना उद्देशून मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले, आपल्याला चिंता व्हायला हवी, की लोकशाही धोक्यात आहे. मी गेल्या 50 वर्षांपासून राजकारण करत आहे, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो आहे. मात्र, मला चिंता आहे. मी प्रदेशाध्यक्ष होतो. भैरव सिंह शेखावत यांचे सरकार पाडण्याचे षडयंत्र झाले होते. मात्र, विरोधात असूनही मी त्यांच्यासोबत उभा होतो. मला वाटते, की आपल्या पक्षातील लोक आपल्याला माहिती देत नाहीत, त्यामुळेच आज आपले नवे रुप पाहायला मिळाले. आपल्याकडचे लोक लपून राजकारण करतात.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाने आतापर्यंत जगभरात घेतला 7.5 लाख लोकांचा बळी, भारत चौथ्या क्रमांकावर!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

Web Title: Amit shah must have felt the biggest push regarding the rajasthan case said cm ashok gehlot in the assembly 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.