Amit Shah on Rahul Gandhi: "राहुल बाबा, इटालियन चष्मा काढा, मगच 8 वर्षांत काय विकास झाला ते दिसेल"; अमित शहांचा राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 04:01 PM2022-05-22T16:01:16+5:302022-05-22T16:01:28+5:30

Amit Shah Attack on Congress: अरुणाचल दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.

Amit Shah | Rahul Gandhi | "Rahul Baba, take off your Italian glasses, then you will see what has happened in 8 years"; Amit Shah slammed Rahul Gandhi | Amit Shah on Rahul Gandhi: "राहुल बाबा, इटालियन चष्मा काढा, मगच 8 वर्षांत काय विकास झाला ते दिसेल"; अमित शहांचा राहुल गांधींना टोला

Amit Shah on Rahul Gandhi: "राहुल बाबा, इटालियन चष्मा काढा, मगच 8 वर्षांत काय विकास झाला ते दिसेल"; अमित शहांचा राहुल गांधींना टोला

googlenewsNext

Amit Shah in Arunachal Pradesh: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) रुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शहांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) खिल्ली उडवली. "राहुल बाबा, डोळे उघडा... इटालियन चष्मा काढा आणि भारतीय चष्मा घाला, मगच तुम्हाला कळेल या 8 वर्षांत काय विकास झाला," अशी टीका अमित शहांनी केली.

अमित शहा इथेच थांबले नाहीत, तर काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, "काँग्रेसवाले डोळे झाकून विकास पाहत आहेत. 8 वर्षात पर्यटन वाढवणे, कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, पायाभूत सुविधा वाढवणे आणि विकास वाढवणे हे पेमा खांडू आणि नरेंद्र मोदी यांच्या डबल इंजिन सरकारने 50 8 वर्षात केलं. काँग्रेसने जगाला ईशान्येतील वाद दाखवला. पण, भाजप सरकारच्या काळात 2019 ते 2022 पर्यंत 9 हजार 600 अतिरेक्यांनी शस्त्रे टाकून सामान्य जीवन जगण्याचे काम केले आहे. आता काही दिवसांत दोन्ही राज्यांमधील सीमावादही संपुष्टात येणार आहे."

राज्यात रस्त्यांचे जाळे विणले
शहा पुढे म्हणाले की, "राज्यातील दूरवरच्या भागांना जोडण्यासोबतच आम्ही संपूर्ण राज्यात रस्त्यांचे जाळे विणले आहे. आम्ही परशुराम कुंडही रेल्वेच्या माध्यमातून जोडू. मी 2 दिवस राज्यात आहे आणि नमसाई जिल्ह्यातील लोकांशी संवाद साधत आहे. पण मला एक गोष्ट मान्य करावी लागेल की, मी देशातील प्रत्येक ठिकाणी भेट दिली आहे परंतु संपूर्ण देशातील सर्वात सुंदर ठिकाण जर असेल तर ते अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचलचे लोक कुठेही भेटले तर लगेच जय हिंद म्हणत त्यांना शुभेच्छा देतात. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली अभिवादनाची ही पद्धत या राज्याशिवाय देशात कुठेही नाही."
 

Web Title: Amit Shah | Rahul Gandhi | "Rahul Baba, take off your Italian glasses, then you will see what has happened in 8 years"; Amit Shah slammed Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.