अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 10:52 AM2017-08-25T10:52:39+5:302017-08-25T11:40:25+5:30

भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विशेष म्हणजे इराणी यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली.

amit shah smriti irani take oath as rajya sabha mp | अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ 

अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ 

Next
ठळक मुद्देभाजपा अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विशेष म्हणजे इराणी यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली.राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दोन्ही भाजपा नेत्यांना शपथ दिली.

नवी दिल्ली, दि. 25 - भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विशेष म्हणजे इराणी यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दोन्ही भाजपा नेत्यांना शपथ दिली. अमित शहा यांनी पहिल्यांदाच राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा हा राज्यसभा सदस्य म्हणून दुसरा कार्यकाळ असणार आहे. 

गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. यामध्ये दोन जागांवर अमित शहा आणि  स्मृती इराणी यांनी विजय नोंदवला. तर तिसऱ्या जागेवर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी विजय मिळवला.निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या दोन आमदारांची मते बाद ठरवल्यानंतर पटेल यांना विजयी घोषित केले.

निवडणुकीत पराभूत झालेल्या बलवंतसिंह राजपूत यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर आक्षेप घेत गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी न्यायालयाने अमित शहा, स्मृती इराणी, अहमद पटेल यांच्यासह निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून 21 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीत एकूण 176 मतं पडली होती, त्यापैकी दोन मतं रद्द झाल्यानंतर 174 मतांची मोजणी झाली आणि कॉंग्रेसच्या अहमद पटेल यांनी विजय नोंदवला. 

या निवडणुकीत विजयी उमेदवारांना मिळालेली मतं-
- अमित शहा यांना 46 मतं मिळाली
- स्मृती इराणी यांना 46 मतं मिळाली
- अहमद पटेल यांना 44 मतं मिळाली
 
  

Web Title: amit shah smriti irani take oath as rajya sabha mp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.