अमित शाह यांनी केली कोरोनावर मात; ट्विट करून म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 05:05 PM2020-08-14T17:05:08+5:302020-08-14T17:27:48+5:30

2 ऑगस्टला  करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले  होते.

Amit Shah's C corona test report has come negative | अमित शाह यांनी केली कोरोनावर मात; ट्विट करून म्हणाले...

अमित शाह यांनी केली कोरोनावर मात; ट्विट करून म्हणाले...

Next

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोनावर मात केली असून शुक्रवारी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. 2 ऑगस्टला  करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले  होते.  अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी त्यांनी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं ट्विट केलं.

ते म्हणाले,''आज माझी कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. मी देवाचे आभार मानतो आणि माझ्या प्रकृतीसाठी ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली व माझ्या कुटुंबीयांना धीर दिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आणखी काही दिवस मी होम आयसोलेशन मध्ये राहणार आहे.''

 त्यांनी पुढे म्हटले की,''कोरोनाशी मुकाबला करण्याकरीता मला मदत करणाऱ्या आणि माझ्यावर उपचार करणाऱ्या मेदांता हॉस्पिटलातील सर्व डॉक्टर्स व स्टाफचेही आभार.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; रोहित शर्माच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

IPL 2020 : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका ठरली; CSK, RCB अन् KKR फ्रँचायझींची चिंता वाढली

Bowl Out काय असतं रे भाऊ? पाक कर्णधाराकडे नव्हतं उत्तर; इरफान पठाणनं सांगितला किस्सा

पाकिस्तानचा पोपट झाला; 3911 दिवसांनी फलंदाजाला दिली संधी, पण त्याला फोडता आला नाही 'भोपळा'!

शाब्बास; UPSC परीक्षेत अंध मुलीचं घवघवीत यश, मौहम्मद कैफनं उलगडला तिचा प्रेरणादायी प्रवास!

Web Title: Amit Shah's C corona test report has come negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.