नवी दिल्ली : देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियनपर्यंत(एक लाख कोटी) नेण्यासाठी गती मिळत नसल्याने केंद्र सरकारने लोकांना डिजिटल अर्थव्यवस्थेबाबत आकर्षित करण्यासाठी विविध क्षेत्रांतील स्टार्सना त्यात सहभागी करण्याचे ठरवले आहे. अमिताभ बच्चन, विराट कोहली, अक्षय कुमार, मिलिंद सोमण यांच्याबरोबरच योगेश्वर दत्त, पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, कपिल देव, तसेच कपिल शर्मा यांना या मोहिमेत सहभागी करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.यातील निवडक लोकांना सरकार या मोहिमेसाठी ब्रँड अॅम्बेसडर बनवू इच्छित आहे. यावर लवकरच निती आयोग व संबंधित मंत्रालयांची बैठक होणार आहे. आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेला ती गती न मिळण्यास अनेक कारणे आहेत.डॉक्टर, अधिकारी, शिक्षक यांचेही घेणार साह्य लोकांवर प्रभाव पाडू शकणाºयांमार्फत डिजिटलचा प्रचार करण्याचे सरकारने ठरवले आहे. असा प्रयत्न पहिल्यांदाच होत आहे. राष्ट्रीय व राज्य अशा दोन स्तरांवर ब्रँड अॅम्बेसडर नेमण्याचा विचार सुरू आहे. जिल्हाधिकारी, डॉक्टर, शिक्षक, रंगभूमी कलाकार, रणजी ट्रॉफी खेळाडू, सरपंच, आयुक्त स्तरावरील अधिकारी आणि कॉमनवेल्थ, एशियन व आॅलिम्पिक खेळाडू यांनाही ते राहतात, त्या भागात ब्रँड अॅम्बेसडर बनविले जावे, असा सरकारचा प्रयत्न आहे.
डिजिटल पेमेंटचा प्रचार अमिताभ, कोहलीमार्फत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 2:06 AM