ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 10- काही दिवसांपूर्वी हरियाणा सरकारने डोक्यावर पदर हा महिलांचा आन बान असल्याचं म्हटलं होतं. त्याचा निषेध करण्यासाठी हरियाणातील एसटीव्ही चॅनेलच्या अँकरने डोक्यावर पदर घेऊन डिबेट शोची सुरुवात केली. हरियाणा सरकारच्या महिलांच्या डोक्यावरील पदरासंदर्भातील भूमिकेचा निषेध करण्यासाठी एसटीव्ही हरियाणा या चॅनेलच्या कार्यकारी संपादक आणि अँकर प्रतिमा दत्ता यांनी डिबेट शोच्या सुरुवातच डोक्यावर पदर घेत शोला सुरूवात केली. हरियाणा सरकारने महिलांच्या डोक्यावरील पदर त्यांची आन बान असल्याचं म्हंटल्यानंतर सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली होती.
या डीबेट शोच्या सुरूवातीलाच डोक्यावर पद घेत,"घुंगटच्या बाहेर काहीही पाहणं सोपं नाही. घुंगट म्हणजे महिलांच्या हातात घातलेल्या बेड्या आहेत, असं त्या अँकरने म्हंटलं. त्यानंतर डोक्यावरचा पदर बाजूला करत, सरकार त्यांच्या माता-बहिणींची ओळख काढून घेतं आहे, असं म्हंटलं. माझ्या डोक्यावरचा पदर काढल्यावर मी कोण आहे, हे सगळ्यांना समजलं, असंही त्या अँकरने पुढे म्हंटलं.
आणखी वाचा
Alert! चुकूनही नका करू अशा व्हॉट्सअॅप मेसेजवर क्लिक
एअर इंडियाच्या देशांतर्गत प्रवासात आता फक्त "व्हेज जेवण"
राहुल गांधींची चीन भेट...हे तर "भक्तां"चं षडयंत्र - काँग्रेस
हरियाणा सरकारच्या कृषी संवाद नावाच्या मासिकाच्या नुकत्याच आलेल्या अंकात पदर घेतलेल्या महिलेचं छायाचित्र छापण्यात आलं आहे. ही महिला आपल्या डोक्यावर चारा घेऊ जात असून "घूंघट की आन-बान, म्हारे हरियाणा की पहचान’, असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. हे मासिक राज्य सरकारच्या हरियाणा संवाद मासिकाची पुरवणी आहे. मासिकाच्या मुखपृष्ठावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा फोटोही छापण्यात आला आहे.
हरियाणा सरकारच्या या विधानावर कुस्तीपटू गीता फोगाटनेही टीका केली होती. आम्ही चार भिंतीमधून बाहेर पडून कुस्तीमध्ये देशाचं नाव उज्ज्वल केलं, तिथेच महिलांना पदराची सक्ती केली जाते, असंही गीता फोगाटने म्हंटलं होतं.