प्राचीन भारतात दुर्गा होती संरक्षणमंत्री, लक्ष्मी वित्तमंत्री - उपराष्ट्रपती नायडू यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 02:30 AM2017-09-25T02:30:03+5:302017-09-25T02:30:23+5:30

प्राचीन भारतात देवी दुर्गा ही संरक्षणमंत्री होती तर संपत्तीची देवी असलेली लक्ष्ंमी वितंतमंत्री होती, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.

In ancient India, Durga was the Defense Minister, Laxmi Finance Minister - Vice President Naidu's rendition | प्राचीन भारतात दुर्गा होती संरक्षणमंत्री, लक्ष्मी वित्तमंत्री - उपराष्ट्रपती नायडू यांचे प्रतिपादन

प्राचीन भारतात दुर्गा होती संरक्षणमंत्री, लक्ष्मी वित्तमंत्री - उपराष्ट्रपती नायडू यांचे प्रतिपादन

Next

नवी दिल्ली : प्राचीन भारतात देवी दुर्गा ही संरक्षणमंत्री होती तर संपत्तीची देवी असलेली लक्ष्ंमी वितंतमंत्री होती, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.
मोहाली येथील इंडियन स्कूल आॅफ बिझिनेसमध्ये आयोजित ‘लीडरशिप समिट’मध्ये बोलताना नायडू यांनी महिला सशक्तीकरणाचे महत्व विषद करण्यासाठी
विविध देवींचा संदर्भ दिला. पुराणांचा हवाला देऊन ते म्हणाले की, देवी सरस्वती शिक्षणमंत्री, देवी दुर्गा संरक्षणमंत्री तर देवी लक्ष्मी वित्तमंत्री होती असे दिसते.
भारतीय तत्त्वज्ञान आणि ंसंस्कृतीमध्ये स्त्रीशक्तीला सर्वोच्च महत्व दिले आहे, असे नमूद
करून नायडू यांनी महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी देण्यावर भर दिला. आपण आपल्या देशाला ‘भारतमाता’ म्हणतो. एवढेच नव्हे तर गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, महानदी, तापी या देशातील महत्वाच्या नद्यांची नावेही स्त्रीवाचकच आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा आदर बाळगायला हवा, असे सांगून उपराष्ट्रपतींनी समोरच्या व्यक्तीला तुमची भाषा सजत नसेल तरच त्याच्याशी दुसºया भाषेत बोला, असा सल्ला दिला.
नायडू म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समाजातील असहिष्णुता यावर गेले काही दिवस बरीच चर्चा होत आहे. पण समाजात अहिष्णुता वाढत आहे, असे म्हणणे बरोबर होणार नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार जरूर आहे. पण ही अभिव्यक्तीही राज्यघटनेच्या चौकटीतच असायला हवी.
उपराष्ट्रपती म्हणाले की, व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जायला हवीच. पण देशाच्या एकात्मतेहून ती मोठी असू शकत नाही. लोकशाही टिकविण्यासाठी काही नियम व बंधने पाळायलाच हवीत.
नवभारताच्या उभारणीसाठी प्रत्येकाने आपल्या आत्मिक शक्तींचा पुरेपूर वापर करायला
हवा, हे अधोरेखित करून त्यांनी विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार, सांप्रदायिकता, जातीयवाद, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, लैंगिक भेदभाव आणि महिला व दुर्बल घटकांवरील अत्याचारांविरुद्ध एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.

आपण मनापासून जे वाटते, ते स्पष्टपणे बोलून मोकळे होतो. बºयाच वेळा तसे करणे राजकीयदृष्ट्या योग्यही नसते, अशी कबुली देत नायडू म्हणाले की, आता उपराष्ट्रपती झाल्याने बोलताना जरा संयम बाळगावा, असा काही लोक मला सल्ला देतात, पण मन मोकळे केले नाही, तर मी ‘फुगत’ जाईन व ते माझ्या प्रकृतीसाठी चांगले नाही!

Web Title: In ancient India, Durga was the Defense Minister, Laxmi Finance Minister - Vice President Naidu's rendition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.