इस्रोची गगनभरारी ! भारताच्या 'हायसिस'सह 8 देशांच्या 30 उपग्रहांचे महाउड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 10:05 AM2018-11-29T10:05:13+5:302018-11-29T11:15:09+5:30

अंतराळ विश्वात भारतानं नवी भरारी घेतली आहे. श्रीहरिकोटा येथून इस्त्रोकडून आज 'पीएसएलव्ही सी 43' अंतराळ यानाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे

Andhra Pradesh : ISRO launches HysIS and 30 other satelites on PSLV-C43 from Satish Dhawan Space Centre in Sriharikota | इस्रोची गगनभरारी ! भारताच्या 'हायसिस'सह 8 देशांच्या 30 उपग्रहांचे महाउड्डाण

इस्रोची गगनभरारी ! भारताच्या 'हायसिस'सह 8 देशांच्या 30 उपग्रहांचे महाउड्डाण

Next
ठळक मुद्देPSLV C-43 च्या मदतीनं इस्त्रोकडून 30 उपग्रहांचं प्रक्षेपणभारतासहीत 8 देशांच्या 30 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपणपृथ्वीचं निरीक्षण करणारा 'हायसिस' भारतीय उपग्रहदेखील अवकाशात झेपावला

आंध्र प्रदेश - अंतराळ विश्वात भारतानं नवी भरारी घेतली आहे. श्रीहरिकोटा येथून इस्त्रोकडून आज 'पीएसएलव्ही सी 43' अंतराळ यानाच्या मदतीनं तब्बल 30 उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात झेपावले आहेत. पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या हायसिस या भारतीय उपग्रहासहीत 8 देशांच्या 30 उपग्रहांचा यामध्ये समावेश आहे. 30 पैकी 23 उपग्रह हे एकट्या अमेरिकेचे होते. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन यांच्या प्रत्येकी एक-एक उपग्रहाचा समावेश आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी 43चे गुरुवारी (29 नोव्हेंबर) सकाळी 9.58 वाजता प्रक्षेपण करण्यात आले. 



 

पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणाऱ्या हायसिसच्या मदतीने जमीन, पाणी, वनस्पती आणि अन्य गोष्टींची माहिती मिळवता येणार आहे. प्रदुषणाची माहिती देण्यामध्ये या उपग्रहाची सर्वाधिक मदत होईल. या उपग्रहाचं वजन 380 किलो एवढे आहे.  

दरम्यान, पीएसएलव्हीचे हे 45 वे उड्डाण आहे. एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम इस्त्रोच्या नावावर आहे. इस्त्रोने 15 फेब्रुवारी 2017 रोजी सर्वाधिक 104 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.



 



 



Web Title: Andhra Pradesh : ISRO launches HysIS and 30 other satelites on PSLV-C43 from Satish Dhawan Space Centre in Sriharikota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.