मल्याविरुद्ध आणखी एक दोषारोपपत्र, न्यायालयाचे अटक करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:02 AM2018-06-21T05:02:22+5:302018-06-21T05:02:22+5:30

बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला गेलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्या याच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आणखी एक दोषारोपपत्र विशेष न्यायालयात बुधावरी सादर केले.

Another charge sheet against Mallya, order to arrest the court | मल्याविरुद्ध आणखी एक दोषारोपपत्र, न्यायालयाचे अटक करण्याचे आदेश

मल्याविरुद्ध आणखी एक दोषारोपपत्र, न्यायालयाचे अटक करण्याचे आदेश

Next

मुंबई : बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला गेलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्या याच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आणखी एक दोषारोपपत्र विशेष न्यायालयात बुधावरी सादर केले. त्यावर मल्ल्याला अटक करण्याचा
आदेश न्यायालयाने दिला. ईडीने मल्ल्याविरुद्ध आणखी एक दोषारोपपत्र सादर केल्याची दखल घेत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. आझमी यांनी विजय मल्ल्याविरुद्ध नव्याने अजामिनपात्र वॉरंट जारी केले. त्याशिवाय न्यायालयाने मल्ल्याची किंगफिशर
एअरलाईन्स (केएफए) आणि युनायटेड ब्रेव्हेरीज होल्डिंग्स लि. (यूबीएचएल) यांनाही समन्स बजावत पुढील सुनावणी ३० जुलैला ठेवली.
ईडीने मल्ल्यावर पहिले दोषारोपपत्र गेल्या वर्षी दाखल केले. आयडीबीआय बँकेला ९०० कोटी रुपयांना बुडविल्याचा आरोप मल्ल्यावर आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या तक्रारीवरून नवे दोषारोपोपत्र दाखल करण्यात आले आहे. २००५ ते २०१०मध्ये घेतलेले कर्ज परत न केल्याने बँकेला ६,०२७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडियाने ईडीकडे तक्रार केली.

Web Title: Another charge sheet against Mallya, order to arrest the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.