उत्तर प्रदेशात आणखी एक रेल्वे अपघात; सोनभद्रमध्ये शक्तिपुंज एक्स्प्रेसचे 7 डबे रूळावरून घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 08:45 AM2017-09-07T08:45:25+5:302017-09-07T08:55:56+5:30

उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक रेल्वे अपघात घडला आहे.

Another railway accident in Uttar Pradesh; The seven coaches of Shaktipunj Express in Sonbhadra collapsed from Rola | उत्तर प्रदेशात आणखी एक रेल्वे अपघात; सोनभद्रमध्ये शक्तिपुंज एक्स्प्रेसचे 7 डबे रूळावरून घसरले

उत्तर प्रदेशात आणखी एक रेल्वे अपघात; सोनभद्रमध्ये शक्तिपुंज एक्स्प्रेसचे 7 डबे रूळावरून घसरले

Next
ठळक मुद्दे उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक रेल्वे अपघात घडला आहे.उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये गुरूवारी सकाळी सहा वाजता रेल्वे अपघात झाला.हावडा-जबलपूर शक्तिपुंज एक्स्प्रेसचे सात डबे रूळावरून घसरल्याची माहिती मिळते आहे.

लखनऊ, दि. 7- उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक रेल्वे अपघात घडला आहे. उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये गुरूवारी सकाळी सहा वाजता रेल्वे अपघात झाला. हावडा-जबलपूर शक्तिपुंज एक्स्प्रेसचे सात डबे रूळावरून घसरल्याची माहिती मिळते आहे. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र-ओबराच्या जवळ असलेल्या छपराकुंड स्टेशन जवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. 


या अपघातात जीवितहानी झालेली नाही पण काही प्रवासी किरकोळ जखमी झाला नसल्याचं समजतं आहे. शक्तिपुंज एक्स्प्रेस हावडावरून जबलपूरला जात असताना ही घटना घडली आहे. रेल्वे रूळ तुटल्याने ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. दरम्यान, शक्तिपुंज एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या सुविधा करून त्यांच्या स्थळी पाठविण्याची व्यवस्था केली जाते आहे. 

एक महिन्यापेक्षा कमी वेळात एक्स्प्रेसचे डबे रूळावरू घसरण्याची ही चौथी घटना आहे. याआधी मुजफ्फरनगर जवळ उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रूळावरून घसरले होते. यामध्ये 23 प्रवाशांचा  मृत्यू झाला होता, तर  अनेक जण जखमी झाले होते. 

उत्तर प्रदेशात उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन अपघात; २३ ठार, ४0 जखमी
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे शनिवारी सायंकाळी पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून २३ प्रवासी मृत्युमुखी पडले आणि ४0 हून अधिक जखमी झाले. उत्कल एक्स्प्रेस अपघात प्रकरणी 13 रेल्वे कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन करण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये कनिष्ठ अभियंत्याचाही समावेश आहे. निलंबित करण्यात आलेला कनिष्ठ अभियंता आणि हॅमरमॅन यांच्यासहित 11 कर्मचारी कोणतीही परवानगी न घेता अपघात झाला त्या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्तीची कामे करत होते. 

उत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरुन अपघात, 74 प्रवासी जखमी
उत्तर प्रदेशातील आझमगडहून दिल्लीला रवाना झालेल्या कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाला असून एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरले होते. उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाल. अछल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मानवरहीत क्रॉसिंगजवळ रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी फाटक क्रॉस करणा-या डंपरला कैफियत एक्स्प्रेसने धडक दिली. यावेळी कैफियत एक्स्प्रेसचे इंजिनसह दहा डबे रुळावरुन खाली घसरले. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात त्यात ७४ प्रवासी जखमी झाले.
 

उत्तर प्रदेशात वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचा अपघात,  घसरले 4 डबे 

अलाहाबादहून वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचे चार डबे रुळावरुन घसरले होते. शनिवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी ही दुर्घटना घडली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाराणसीजवळ असलेल्या हरदत्तपूर रेल्वे स्टेशन परिसरात या मालगाडीचे चार डबे घसरले. या अपघातानंतर वाराणसी-अलाहाबाद मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः ठप्प झाला होता. यामुळे अन्य गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलं.  या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Web Title: Another railway accident in Uttar Pradesh; The seven coaches of Shaktipunj Express in Sonbhadra collapsed from Rola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.