शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

संसदेत शिवसेना विरोधी बाकांवर; रालोआ बैठकीचे निमंत्रण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 4:36 AM

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने रविवारी होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला न पाठवून भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने रविवारी होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला न पाठवून भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यसभेतील शिवसेना सदस्यांची जागा बदलून त्यांना विरोधी बाकांवर बसविण्याचीही पूर्वतयारी झाल्याचे समजते. अर्थात, शनिवारी सकाळी खा. संजय राऊत यांनी रालोआतून बाहेर पडणे हा आता केवळ उपचार आहे, असे स्पष्टपणे सांगितलेच होते.दिल्लीत शिवसेनेचे लोकसभेतील नेते विनायक राऊत म्हणाले की, रालोआ बैठकीचे आमंत्रण नसल्याने जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. राज्यसभेतील शिवसेना सदस्यांची जागा बदलल्याचे समजते. रालोआत शिवसेनेला स्थान नाही, असे म्हणणाऱ्यांनी रालोआची स्थापनाच मुळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली होती, याची आठवण ठेवावी.या अधिवेशनावर यंदा भाजप-शिवसेना संघर्षाचे सावट असेल. सभागृहातील भाजपची कोंडी करण्याची एकही संधी न सोडण्याची तयारी शिवसेनेने चालवली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संभाव्य आघाडीचे प्रतिबिंब लोकसभा व राज्यसभेत उमटेल, हे स्पष्ट आहे. तसे झाल्यास राष्ट्रीय पातळीवर काही मुद्द्यांवर या तिन्ही पक्षांतील अभूतपूर्व ऐक्य दिसेल.भाजपला परिणाम भोगावे लागतीलविनायक राऊत म्हणाले की, भाजपला देशात कुणीही विचारत नव्हते, तेव्हा शिवसेनाप्रमुखांना आसरा दिला. शिवसेनेचा भाजपला आधार होता. आता आधारालाच धक्का देण्याची कृती भाजप नेते करीत आहेत. भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागतील.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाParliamentसंसद