लखनऊ: कोविशील्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि या लसीला परवानगी देणाऱ्या आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओविरोधात लखनऊमधील एका व्यापाऱ्यानं एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आपल्या शरीरात एँटीबॉडी तयार न झाल्याचा दावा टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या प्रताप चंद्र यांनी केला आहे. रुग्णांमध्ये दिसतोय 'लॉन्ग कोविड', 6 महिन्यांपर्यंत राहतात लक्षणं; एम्सचे डॉ. नीरज निश्चल यांनी दिली महत्वाची माहितीकोविशील्डची लस घेतल्यानंतर शरीरात एँटीबॉडीज तयार होत नाहीत. हा लोकांसोबत केलेला विश्वासघात आहे. त्यामुळे या कंपनीविरोधात आणि या लसीला मंजुरी देणाऱ्या संस्थांविरोधात कारवाई व्हायला हवी, अशी मागणी प्रताप चंद्र यांनी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, जागतिक आरोग्य संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ट्रेड्रोस एधोनम, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालिका अपर्णा उपाध्याय यांच्या विरोधात प्रताप चंद्र यांनी लखनऊमधील आशियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.लस घेतल्यानंतर दंडात येतो करंट? त्या विजेने बल्बही पेटतो?; जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओमागचं सत्यया प्रकरणाच्या तपासासाठी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम गुप्ता यांनी दिली. 'लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अँटीबॉडी तयार होतील, असं आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओनं स्पष्ट म्हटलं होतं. पण माझ्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या नाहीत. सीरमनं या लसीचं उत्पादन केलं आहे. आयसीएमआर, डब्ल्यूएचओ आणि आरोग्य मंत्रालयानं या लसीला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशननं या लसीचा प्रचार केला. त्यामुळे सगळे दोषी आहेत,' असं प्रताप चंद्र म्हणाले.
Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतली, पण एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 11:45 AM