नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी (दि.5) विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा देशातील पुडुच्चेरीपासून ते विदेशातील कोलंबिया, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही तीव्र निषेध केला आहे.
राजकीय पक्षांनीही या घटनेचा धिक्कार केला असून, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतांनीही या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला. याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट केले असून विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत हल्लोखोरांवर कारवाई करावी करावी, असे म्हटले आहे. अनुपम खेर यांचे ट्विट सोशल मीडिवर व्हायरल होत आहे.
अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "जेएनयूमध्ये हिंसाचार पसरवाला त्या गुंडांना लवकरात लवकर पकडा. विद्यापीठाच्या परिसरात रक्तपात होऊ शकत नाही. त्या मास्कधारी लोकांची ओळख लवकर पटली पाहिजे. अशा भयंकर घटनांमध्ये सामान्य संशयितांचे 'डायरेक्ट टू कॅमेरा' अपील करा. ते लोक विद्यार्थ्यांचा वापर करत आहेत."
दरम्यान, जेएनयूमध्ये काल (सोमवारी) दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. विद्यार्थी कॅम्पसमध्ये जायलाच घाबरत होते. पोलिसांनी तिथे ध्वजसंचलनही केले. पोलिसांनी काही अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असले, तरी कोणालाही अटक झालेली नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी फोनवर चर्चा करून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंती केली आहे. पुडुच्चेरी, बंगळुरू, हैदराबाद, अलिगड, चंदीगड अशा अनेक ठिकाणच्या विद्यापीठ विद्यार्थ्यांनी निदर्शने करून जेएनयूतील हल्ल्याचा धिक्कार केला.
आणखी बातम्या...JNU Attack: 'या' संघटनेनं स्वीकारली जेएनयूतील हिंसाचाराची जबाबदारीJNU Attack : गेटवेवरील आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आझाद मैदानात रवानगीजेएनयूमधील हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद