नवी दिल्ली - ‘मोदी सरकारने २ अब्ज रोजगार निर्माण केले आहेत. मंगळावरील लोकही आता भारतात काम करीत आहेत. स्मार्ट सिटींमध्ये यंत्रमानवांकडून कचरा गोळा केला जात आहे' असे ‘एप्रिल फूल’निमित्त खास टिष्ट्वट करून काँग्रेसने मोदी सरकारची नामी खिल्ली उडविली. हा दिवस ‘जुमला दिवस' असल्याचेही या पक्षाने म्हटले आहे.नीरव मोदीची सफाई मोहीमकाँग्रेसने अधिकृत टिष्ट्वटर हँडलवर रविवारी ‘ब्रेकिंग न्यूज' देणारे उपरोधिक शैलीतील व्हिडिओ व काही टिष्ट्वट झळकवले. त्यातील एका बातमीनुसार ‘निश्चलनीकरणाने भ्रष्टाचार संपविला, पंजाब नॅशनल बँक ‘साफ' करुन नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचेच काम केले आहे.'गंगेत मोदींचे प्रतिबिंबनमामी गंगे हा पंतप्रधानांचा लाडका प्रकल्पही काँग्रेसच्या तडाख्यातून सुटलेला नाही. त्यासंदर्भात टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, ‘गंगा नदी सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून इतकी मुक्त झाली आहे की, तिच्या स्वच्छ पाण्यामध्ये नरेंद्र मोदी यांचे लख्ख प्रतिबिंब आता पाहाता येते. 'खात्यात बाकी शून्यएखाद्याच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर बँकेकडून जो एसएमएस किंवा मेल येतो त्या धर्तीवर काँग्रेसने केलेल्या टिष्ट्वटमध्ये ‘तुमच्या खात्यावर ‘अच्छे दिन’निमित्त १५ लाख रुपये जमा झाले आहेत, पण खात्यात शिल्लक शून्य आहे!'विनोद नव्हे वस्तुस्थिती आहे...इंधनाच्या दरवाढीबद्दल टीका करताना काँग्रेसने म्हटले आहे की, ‘डिझेलचे दर कधी नव्हे इतके वाढले आहेत. पेट्रोलने चार वर्षांतील दरवाढीचा उच्चांक गाठला आहे. एकदा वाटले की, एप्रिल फूलसाठी केलेली ही क्रूर थट्टा आहे, पण दुर्दैवाने ही थट्टा नव्हे, खरंच दरवाढ झाली आहे.'
एप्रिल फूल : काँग्रेसने साजरा केला ‘जुमला दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 1:00 AM