नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचेकलम 370 रद्द करण्याच्या प्रस्तावावर भाजपा व्होटबँकेचे, जातीयवादाचे राजकारण करत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र, काश्मीरमध्ये केवळ मुस्लिमच राहतात का? तुम्हाला काय म्हणायचे आहे. काश्मीरमध्ये मुस्लिम, हिंदू, शीख, जैन, बुद्धिस्टही राहतात. जर 370 कलम चांगले असेल तर ते सर्वांसाठी चांगले आणि जर वाईट असेल तर सर्वांसाठी वाईटच असणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.
गृह मंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मांडले. यानंतर त्यांनी राज्यसभेमध्ये चर्चेत भाग घेतला. आयुष्यमान भारत योजना राबविली पण काश्मीरमध्ये हॉस्पिटल कुठे आहेत? तेथे डॉक्टर, नर्स कुठे आहेत. जे काश्मीरमध्ये 35 ए कलमाला पाठिंबा देत आहेत त्यांनी जरा सांगावे की कोणता नावाजलेला डॉक्टर तेथे जाऊन सेवा देतो? तो डॉक्टर काश्मीरमध्ये घर घेऊ शकत नाही, ना ही जमीन. एवढेच नाही तर त्याची मुलेही तेथे मतदान करू शकत नाही. काश्मीरचा विकास कोणी थांबविला असेल तर तो याच 370 कलमाने, असे अमित शहा यांनी सांगितले.
गुलाम नबी आझाद म्हणाले की, आंतरराज्य लग्ने होतात. पण त्या मुलींच्या अपत्यांना जम्मू काश्मीरमध्ये अधिकार मिळत नाहीत. तुम्ही या लग्नांवर खूश असाल, पण काश्मिरी लोक भारतात मिसळू शकत नाहीत, त्यांना खुलेपणे भारतीयांसोबत मिसळू द्या. विरोधक काश्मीरमध्ये रक्तपात घडेल अशा संसदेत धमक्या देत आहात. तुम्हाला काश्मीरमधील लोकांना काय संदेश देऊ इच्छित आहात. त्या लोकांना 21 व्या शतकामध्ये जगण्याचा अधिकार नाही का? त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी भारतातील विद्यापीठांमध्ये जावे लागते. ते विद्यार्थी लंडन, अमेरिकेमध्ये शिकू शकत नाहीत का, असा सवालही शहा यांनी केला.
370 कलम हे तात्पुरते होते हे सर्वजण मान्य करतात. मात्र, तात्पुरते म्हणजे 70 वर्षे का? जवारलाल नेहरू म्हणाले होते की, 370 कलम घासून घासून संपेल. मात्र ते संपले नाही. जपून ठेवण्य़ात आल्याचे शहा म्हणाले.