कॅशलेस व्यवहार करताय? तर वाचाच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 03:26 PM2017-08-07T15:26:26+5:302017-08-07T15:26:39+5:30
पैशांची देवाणघेवाण करण्यासह ऑनलाईन वस्तू खरेदीचे व्यवहार 'कॅशलेस' करण्याच्या दृष्टीने भारत सरकारचे नियंत्रण असणा-या...
नवी दिल्ली, दि. 7 - तूम्ही 'कॅशलेस' व्यवहार करण्यासाठी भीम अॅप चा वापर करत असाल? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून तुम्हाला भीम अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मोठा कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे.
नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भीम अॅप्लिकेशनची निर्मिती केली होती. पैशांची देवाणघेवाण करण्यासह ऑनलाईन वस्तू खरेदीचे व्यवहार 'कॅशलेस' करण्याच्या दृष्टीने भारत सरकारचे नियंत्रण असणा-या भारतीय राष्ट्रीय भरणा कॉपोर्रेशन (एन.पी.सी.आय.) या संस्थेने भीम अॅप (भारत इंटरफेस फॉर मनी) तयार केले. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जानेवारी 2017 च्या पहिल्या आठवड्यापासून झाली होती. भीम अॅप लॉंच झाल्यानंतर आत्तापर्यंत 16 दशलक्ष युझर्सनी डाऊनलोड केलं आहे.
एन.पी.सी.आय.चे व्यवस्थापकीय संचालक ए.पी होटा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती. आमचं सरकारसोबत बोलणं झालं आहे. 15 ऑगस्टपासून भीम अॅपच्या युजर्सला मोठा कॅशबॅक देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. भीम अॅपचा वापर वाढण्याच्यादृष्टीने कंपनीने ही ऑफर जाहीर केली आहे. या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की, १५ ऑगस्टपर्यंत आम्हाला परवानगी देण्यात येईल. अशी माहिती ए.पी होटा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली.
सध्या एखादा युझरने दुस-या युझरला भीम अॅप्लिकेशन वापरण्यासाठी प्रोत्साहीत केल्यास त्याला त्याबदल्यात 25 रुपये मिळतात. तर 10 ते 25 रूपयापर्यंत कॅशबॅकही मिळतोय. भीम अॅपवर यापेक्षा जास्त कॅशबॅक देण्याच्या प्रस्तावाला 15 ऑगस्ट पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
कसं काम करतं भीमअॅप ?
- अँड्रॉईड स्मार्टफोनवर लॉन्च अॅप BHIM प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा.
- त्यानंतर तुमचं बँक खातं आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा. (हा पर्याय अप डाऊनलोड करतानाचा विचारला जातो)
- तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल.
- मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भीम अॅपचा वापर करता येईल.
- इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा पर्याय या अॅपमध्ये सध्या उपलब्ध आहे.