जम्मू : काश्मीर मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान तोंडघशी पडल्याने त्यांच्या सैन्याने आज सकाळपासून एलओसीवर जोरदार गोळीबार केला. यामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला असून भारतीय जवानांनीपाकिस्तानची चौकीच उद्ध्वस्त केली आहे.
पाकिस्तानने शनिवारी सकाळी 6.30 वाजता राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सकाळपासून मोर्टर आणि गोळीबार सुरू केला. यामध्ये लान्स नायक संदीप थापा हे शहीद झाले. ते देहरादूनचे आहेत. पाकच्या गोळीबाराला जवानांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिले.
म्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून भारतामध्ये कुरापती करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडविण्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची अधिकृत माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. काल भारतीय जवानांच्या प्रत्यूत्तरात पाकचे चार सैनिक ठार झाले आहेत.
काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट, फोनसेवा या गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. आज प्रशासनाकडून काही ठिकाणच्या सेवांवरील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. सोमवारपासून रस्त्यावर पर्यटकांच्या गाड्यांचीही रेलचेल सुरु होईल. गेल्या 12 दिवसांत कुठेही हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत अशी माहिती प्रशासनाने दिली.
काश्मीर प्रकरणावरुन सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर पाकिस्तान सरकारकडून उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक सध्या पाकिस्तानात सुरु आहे. या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा होणार आहे. या बैठकीवर भारताची करडी नजर असणार आहे कारण यामध्ये पाकिस्तानची पुढील रणनीती काय असेल यावर निर्णय होणार आहे.