शोपिया चकमक: दहशतवादी समजून मजुरांचे एन्काऊन्टर; सैन्याचे कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 08:11 PM2020-09-18T20:11:16+5:302020-09-18T20:11:47+5:30

अमाशीपोरामध्ये चकमकीत ठार झालेले लोक हे दहशतवादी नव्हते, तर ते मजूर होते, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. हे सर्वजण राजौरीचे होते.

Army Indicts Troops In Shopian Encounter That Killed 3 Men, Orders Action | शोपिया चकमक: दहशतवादी समजून मजुरांचे एन्काऊन्टर; सैन्याचे कारवाईचे आदेश

शोपिया चकमक: दहशतवादी समजून मजुरांचे एन्काऊन्टर; सैन्याचे कारवाईचे आदेश

Next

श्रीनगर : भारतीय सैन्याने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात 18 जुलै रोजी झालेल्या चकमकप्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. सैन्य दलाला प्राथमिक दृष्ट्या पुरावे सापडले असून भारतीय जवानांनी (Amashipora Shopian) जिल्ह्यातील एका कारवाईत अफस्पा कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. यामुळे सैन्य दलाने जवानांविरोधात कारवाई सुरु केली आहे. 


अमाशीपोरामध्ये चकमकीत ठार झालेले लोक हे दहशतवादी नव्हते, तर ते मजूर होते, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. हे सर्वजण राजौरीचे होते. य़ा वादानंतर सैन्याने चौकशीचे आदेश दिले होते. अमाशीपोरामध्ये कथितरित्या दहशतवाद्यांची चकमक झाली होती. यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. यावर श्रीनगरचे संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, सोशल मीडियावर या चकमकीबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. यामध्ये राजौरीचे राहणारे तीन जण अमशीपोरा येथून बेपत्ता झाले होते, असे म्हटले होते. 


या चकमकीत जे लोक मारले गेले होते त्यांचा दहशतवादाशी कोणताही संबंध नव्हता, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. हे सारे मजूर होते. त्यांना दहशतवादी सांगून मारण्यात आले होते. या सर्वांचे डीएनए सॅम्पल सैन्याने घेतले होते. मात्र, नंतर वाद सुरु झाल्याने सैन्याने चार आठवड्यांत याची चौकशी पूर्ण करत जवानांवर कारवाई सुरु करण्याचा आदेश दिला आहे. 

अफस्पाच्या नियमांचे उल्लंघन
सैन्याने चौकशी पूर्ण झाल्यावर सांगितले की, या चकमकीदरम्यान अफस्पा, 1990 नुसार सैन्याला मिळालेल्या ताकदीचा गैरवापर केला आहे. याचे पुरावे समोर आले आहेत. यामुळे सैन्य दलाने या चकमकीत सहभागी असलेल्या जवानांविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरु केली आहे. 

Web Title: Army Indicts Troops In Shopian Encounter That Killed 3 Men, Orders Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.