सैन्य करेल दहशतवादाचा नायनाट; जम्मू दौऱ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:47 AM2023-12-28T05:47:42+5:302023-12-28T05:48:28+5:30

तुम्ही विजय मिळवाल. पण हे करतानाच लोकांचीही मने जिंका, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.

army will eradicate terrorism said rajnath singh during his visit to jammu | सैन्य करेल दहशतवादाचा नायनाट; जम्मू दौऱ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास

सैन्य करेल दहशतवादाचा नायनाट; जम्मू दौऱ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास

राजौरी/ जम्मू : भारतीय जवानांच्या शौर्यावर आमचा विश्वास आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा भारतीय सैन्य नायनाट करेल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. दरम्यान, देशातील नागरिकांचे नुकसान होईल, अशी कोणतीही चूक करू नये असे आवाहनही त्यांनी सैनिकांना केले.

नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंहजम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले. ते राजौरी व जम्मूच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. 

सैनिकांच्या शौर्याचे कौतुक... लोकांची मने जिंका

राजौरी येथील लष्करी छावणीत सैनिकांना संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी सैनिकांच्या शौर्याचे कौतुक केले. मला तुमच्या शौर्यावर विश्वास आहे. जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपला पाहिजे. मला विश्वास आहे की, तुम्ही विजय मिळवाल. पण हे करतानाच लोकांचीही मने जिंका, असेही संरक्षणमंत्री म्हणाले. 

 

Web Title: army will eradicate terrorism said rajnath singh during his visit to jammu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.