स्वरा भास्करला अटक करा, हिंदुत्व दहशतवादावरील ट्विटनंतर अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:23 PM2021-08-18T12:23:38+5:302021-08-18T12:27:56+5:30
आम्ही हिंदुत्वात दहशतवादासोबत ठीक असूच शकत नाही आणि आम्ही तालिबानी आतंकी हल्ल्याने तुटलो असून आम्हाला मानसिक धक्का बसला आहे. आम्ही तालिबानच्या दहशवादाने शांत राहू शकत नाही,
नवी दिल्ली - तालिबानने ज्या पद्धतीने काबुलवर आक्रमण करुन राष्ट्रपती भवन ताब्यात घेतलं. संपूर्ण अफगाणिस्तानवर आपली सत्ता काबिज केल्याचंही जाहीर केलं. त्यावरुन, जगभरात खळबळ उडाली आहे. त्यातच, जवळपास 5 देशांनी तालिबानी सरकारला समर्थन केलं असून भारताच्या सीमारेषेवरील चीन, बांग्लादेश आणि पाकिस्तानचा यात समावेश आहे. त्यामुळे, भारतासोबत तालिबाचे संबंध कसे असतील, यावर चर्चा झडत आहेत. त्यातच, अनेक भारतीय सेलिब्रिटीही आपलं मत व्यक्त करत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
स्वरा भास्कर ट्विटरवरील आपल्या कमेंटमुळे सातत्याने चर्चेत असते. अनेकदा नेटीझन्सकडून तिला ट्रोलही करण्यात येते. तर, अनेकजण तिच्या विचारांचे, विधानांचे समर्थनही करतात. नुकतेच स्वराने अफगाणिस्तानमधील घडामोडींवर भाष्य करताना, तालिबानी दहशतवाद्यांची तुलना हिंदुत्ववाद्यांशी केली आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर स्वराला ट्रोल करण्यात येत आहे. स्वरा भास्करला अटक करण्याची मागणीही नेटीझन्सने केली आहे. ट्विटरवर #ArrestSwaraBhaskar हा ट्रेंड सुरू झाला आहे.
We can’t be okay with Hindutva terror & be all shocked & devastated at Taliban terror.. &
— Swara Bhasker (@ReallySwara) August 16, 2021
We can’t be chill with #Taliban terror; and then be all indignant about #Hindutva terror!
Our humanitarian & ethical values should not be based on identity of the oppressor or oppressed.
आम्ही हिंदुत्वात दहशतवादासोबत ठीक असूच शकत नाही आणि आम्ही तालिबानी आतंकी हल्ल्याने तुटलो असून आम्हाला मानसिक धक्का बसला आहे. आम्ही तालिबानच्या दहशवादाने शांत राहू शकत नाही, आणि आम्ही सर्वच हिंदू्त्वाच्या दहशतावादाने नाराज आहोत. आमचे मानवी आणि नैतिक मूल्य हे पीडित किंवा उत्पीडीतच्या ओळखीवर अवलंबून आहे, असे ट्विट स्वराने केले आहे. स्वराने आपल्या ट्विटमध्ये हिंदुत्वाची तुलना तालिबानी दहशवादाशी केल्याने नेटीझन्स चांगलेच खवळले आहेत.
Section 295 A IPC
— ShiNNe & tu (@shinne_tu73901) August 18, 2021
Whosoever hurts religious sentiments shall be punished with imprisonment which may extend to 3 years. #ArrestSwaraBhaskar habitual offender inciting communal disharmony !! @dir_ed who pays her for this ??
Report Suspend @ReallySwara@Twitterpic.twitter.com/us4h5oUjWt
नेटीझन्से स्वराला चांगलेच फैलावर घेतले असून भादंविच्या कलम 295 ए अन्वये धार्मिक भावनांना ठेस पोहोविण्याप्रकरणी स्वराला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे ट्विट एका युजर्सने केले आहे. यामध्ये 3 वर्षांपर्यंत कारावाची शिक्षा आहे, असेही त्यानी म्हटले आहे.