तिरुअनंतपुरम: काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. शशी थरूर यांनी त्यांच्या एका पुस्तकातून हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुअनंतपुरमच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांनी शशी थरूर यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. शशी थरूर यांच्या 'द ग्रेट इंडियन नॉवेल' या पुस्तकातील मजकुरावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुस्तकातून हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप शशी थरुर यांच्यावर करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी शशी थरूर यांना समन्स जारी करण्यात आले होते. तसेच, शनिवारी याप्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी शशी थरुर किंवा त्यांच्यावतीने कुणीही वकील कोर्टात हजर नव्हते. त्यामुळे कोर्टाने हजर न राहिल्याने शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी साहित्य अकादमीने इंग्रजीसाठी शशी थरूर यांना ‘एन एरा ऑफ डार्कंनेस’ साठी पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.