पोटनिवडणुकीतील निकालांवरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपाला काढला चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 12:38 PM2018-05-31T12:38:35+5:302018-05-31T12:41:52+5:30
चार लोकसभा आणि 14 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, बहुतांश ठिकाणी भाजपाची पिछेहाट झाली आहे. ही संधी साधत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.
नवी दिल्ली - चार लोकसभा आणि 14 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, बहुतांश ठिकाणी भाजपाची पिछेहाट झाली आहे. ही संधी साधत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. देशभरात मोदी सरकारविरोधात असलेल्या जनतेच्या संतापाचे प्रतिबिंब आजच्या निकालांमधून उमटत आहे. आातापर्यंत लोक विचारत होते की पर्याय काय आहे. पण आता लोक म्हणताहेत की मोदीजी पर्याय नाहीत, आधी त्यांना हटवा.
आज के नतीजे दिखाते हैं की देश भर में मोदी सरकार के ख़िलाफ़ लोगों में बहुत ज़्यादा ग़ुस्सा है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 31, 2018
अभी तक लोग पूछते थे - विकल्प क्या है? अब लोग कह रहे हैं कि मोदी जी विकल्प नहीं हैं, पहले इन्हें हटाओ।
लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यापैकी, पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं असलं, तरी इतर मतदारसंघातील लढतींवरूनही भाजपा आणि काँग्रेसच्या ताकदीचा अंदाज बांधला जाणार आहे. स्वाभाविकच, राजकीय जाणकारांचं लक्ष १४ जागांवर आहे.