अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी १६ फेब्रुवारीला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 06:33 AM2020-02-13T06:33:16+5:302020-02-13T06:33:47+5:30
आप आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून केजरीवाल यांची एकमताने निवड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीत भाजपला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी रविवारी रामलीला मैदानावर होणार आहे. आप आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून केजरीवाल यांची एकमताने निवड करण्यात आली.
The Election Commission of India has lifted model code of conduct imposed in Delhi since January 6 for legislative assembly elections. pic.twitter.com/eDyhU9K3i7
— ANI (@ANI) February 12, 2020
केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून, त्याचा भव्य सोहळा करण्याचे आपने ठरविले आहे. राजधानीत राहणारा आम आदमी म्हणजे सर्वसामान्यांना या सोहळ्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. यशानंतर आपमध्ये उत्साह आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन केजरीवाल यांनी याच मैदानावर केले होते. त्यामुळे तिथे शपथविधी सोहळा आहे.
राज्यपालांची भेट
केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. या भेटीत शपथविधी सोहळ्याबाबत चर्चा झाली. नियमानुसार, केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील व त्यानंतरच पुन्हा शपथ घेऊ शकतील.