- हरिश गुप्ता नवी दिल्ली : राष्ट्रीय आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी आपली मुदत संपण्यापूर्वीच व्यक्तिगत कारणास्तव पदाचा राजीनामा दिला असून, ते पुन्हा अमेरिकेत जाऊ न संशोधन व लिखाण करणार आहेत. त्यांची मुदत आॅक्टोबरमध्ये संपणार होती. मात्र त्याआधीच पीटरसन इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचे फेलो असणाऱ्या सुब्रमण्यन यांनी परतण्याचा निर्णय घेतला.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन व पंतप्रधान मोदी यांचे नोटाबंदीवरून मतभेद झाले होते. त्यानंतर ते अमेरिकेत गेले. त्यांच्यापाठोपाठ निती आयोगातून बाहेर पडण्याचा निर्णय अरविंद पनगढिया यांनी घेतला. त्यांनी सोडू नये, असे प्रयत्न करणाºया मोदींनी त्यांचे कौतुकही केले होते. पण तेही अमेरिकेत निघून गेले.सुब्रमण्यन यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे अरुण जेटली यांच्या फेसबुक पोस्टमुळेच समजले. ते बुधवारी जेटली यांच्या घरी गेले. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सने आपला निर्णय सांगितला. जेटली यांनी सुब्रमण्यन यांच्या आठवणीही या निमित्ताने पोस्ट केल्या आहेत. सुब्रमण्यन अनेकदा माझ्या कार्यालयात येत, ते मला नेहमी मिनिस्टर असे म्हणत आणि बहुधा काही तरी चांगली बातमी सांगत. मी त्यांचा आभारी आहे, ते जाण्याची मला खंत आहे.>मोदी, गोयल गप्पचपंतप्रधान नरेंद्र मोदी वा हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मात्र सुब्रमण्यन यांच्या जाण्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.मोदी त्यांच्यावर फारसे खूशनव्हते. नोटाबंदीचा आर्थिकविकास दरावर परिणाम झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. मोदी यांच्या विकासाच्या गुजरात मॉडेलविषयीही ते साशंक होते.पद स्वीकारण्यापूर्वीहीसुब्रमण्यन यांनी जेटलींच्या पहिल्या हंगामी अर्थसंकल्पावर टीका केली होती. बीफबंदीविषयी एकदा विचारता ते म्हणाले होते की, मी उत्तर दिले तर माझी नोकरी जाईल, हे तुम्हाला माहीत आहे. पण तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.>बंद खोलीत कैद असलेले (माजी?) वित्तमंत्री फेसबूकवर बातमी देतात. देशाच्या तिजोरीच्या चाव्या भाजपाच्या खजिनदाराकडे आहेत. रा. स्व. संघाचा ‘अदृश्य हात’ जहाज बुडवत असता कुशाग्र बुद्धिचे लोक सोडून चालले आहेत. दरम्यान कॅप्टन ‘नमो’ मात्र डाराडूर झोपला आहे. सर्वच विचित्र आहे.-राहुल गांधी,अध्यक्ष, काँग्रेस (टष्ट्वीटरवर)
अरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 4:59 AM