गुवाहाटी : मुसळधार पावसामुळे आसाम आणि मेघालयमध्ये हाहाकार उडाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे दाेन्ही राज्यांमध्ये दाेन दिवसांत ३१ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल १८ लाख लाेकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.मेघालयातील माैसिनराम आणि चेरापुंजी येथे विक्रमी पावसाची नाेंद झाली आहे. चेरापुंजी येथे ९७३ मिलिमीटर पाऊस पडला. तर माैसिनराम येथे १००३ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. १९९५ नंतर प्रथमच या भागात एवढा पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे आसाममधील ३ हजार गावे प्रभावित झाली आहेत. ब्रह्मपुत्रा, गाैरांग, काेपिली, मानस इत्यादी नद्यांना पूर आला आहे. हाेजई जिल्ह्यात पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी नेणारी एक बाेट उलटून ३ मुलांचा मृत्यू झाला. बाेटीत २४ जण हाेते. त्यापैकी २१ जणांना वाचविण्यात यश आले. मात्र, मुलांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)
Assam Flood: आसाम, मेघालयात पुराचे थैमान, दोन दिवसांत ३१ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 7:47 AM