नवी दिल्ली - संरक्षण मंत्रालयाने लष्कराला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लष्करातील ब्रिगेडिअरच्या नेतृत्वाखालील एक नऊ सदस्यीय पथक परदेशात रवाना केले आहे. हे पथक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, इस्राइल आणि यूएई या देशांचा दौरा करून लष्करासाठी नव्या असॉ़ल्ट रायफल आणि क्लोज-क्वॉर्टर बॅटल कार्बाइनच्या खरेदीची शक्यता चाचपडून पाहणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने मार्च महिन्यामध्ये ७२ हजार असॉल्ट रायफल आणि ९३ हजार ८९५ सीबीक्यू कार्बाइन खरेदीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. या रायफल आणि कार्बाइन चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी फास्ट ट्रॅक प्रोसिजर सुरू करण्यात आली आहे.
लष्कराला मिळणार घातक शस्रास्त्रे, खरेदीसाठी पथक परदेशात रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 6:36 PM