CoronaVirus News: काल हायकोर्टानं झापलं, आज शहाणपण सुचलं; निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 10:39 AM2021-04-27T10:39:55+5:302021-04-27T10:52:08+5:30

CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरून मद्रास हायकोर्टानं कानउघाडणी केल्यावर अखेर निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय

assembly election 2021 Election Commission bans all victory processions on or after the day of counting of votes | CoronaVirus News: काल हायकोर्टानं झापलं, आज शहाणपण सुचलं; निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय

CoronaVirus News: काल हायकोर्टानं झापलं, आज शहाणपण सुचलं; निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय

googlenewsNext

नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार आहे, अशी खरमरीत टिप्पणी काल मद्रास उच्च न्यायालयानं केली. उच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाची चांगलीच कानउघाडणी केली. निवडणूक असलेल्या राज्यांत हजारोंच्या सभा सुरू होत्या, तेव्हा तुम्ही दुसऱ्या ग्रहावर होतात का, अशा सवाल न्यायालयानं उपस्थित केला. यानंतर आता निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २ मे रोजी चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर विजयी मिरवणुका काढू नका, अशी सूचना निवडणूक आयोगानं केली आहे. निवडणूक आयोगानं मिरवणुकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच आयोगाकडून आदेश काढण्यात येणार आहे. 




काय म्हणालं मद्रास उच्च न्यायालय?
राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी दिलीत, असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीब बॅनर्जींनी काल झालेल्या सुनावणीदरम्यान उपस्थित केला. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्या अधिकाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशा शब्दांत न्यायालयानं संताप व्यक्त केला. न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसभांमध्ये फेसमास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम यांचे नियम धाब्यावर बसवले गेले, याबद्दल न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली.

मोठ्ठा दिलासा! देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घसरली; बरे होणाऱ्यांची वाढली

निवडणूक प्रचारसभा सुरू असताना तुम्ही कोणत्या जगात होतात, असा संतप्त सवाल न्यायमूर्तींनी विचारला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी काय उपाययोजना करणार आहात, असा प्रश्नदेखील न्यायाधीशांनी उपस्थित केला. मतमोजणीवेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची ब्लूप्रिंट सादर करा. अन्यथा २ मे रोजी होणारी मतमोजणी रोखू, असा गर्भित इशारादेखील त्यांनी दिला.

'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता

देशातील जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं आणि घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागते ही बाब दुर्दैवी आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे. तो त्यांना लोकशाहीनं दिला आहे. पण जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना हा अधिकार बजावता येईल. सध्या बचाव आणि सुरक्षेलाच सर्वाधिक प्राधान्य आहे. बाकीच्या बाबी यानंतर येतात, असं न्यायमूर्ती म्हणाले.
 

Web Title: assembly election 2021 Election Commission bans all victory processions on or after the day of counting of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.