...तर चीन, पीओकेमध्ये होऊ शकतो मोठा विनाश; काशीच्या ज्योतिषाची भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:04 PM2020-06-11T20:04:39+5:302020-06-11T20:07:02+5:30
या ग्रंथाच्या श्लोकात लिहिले आहे की, आषाढ महिन्यातील येणारं सूर्यग्रहण पृथ्वीच्या या भागांसाठी हानिकारक ठरू शकते.
नवी दिल्लीः येणारा काळ चीन अन् त्याच्याशी संबंधित भूभागांसाठी चांगला ठरणार नाही, असे संकेत सूर्यग्रहणाच्या आधारावर काशीच्या ज्योतिषांनी दिले आहेत. 21 जूनला होणारं सूर्यग्रहण गांधार (कंधार), पीओके (पुलिंद), काश्मीर भूभाग (काश्मीर) आणि चीनसाठी विनाशकारी सिद्ध होईल, असा दावा काशीच्या ज्योतिषांनी केला आहे. 6व्या शतकात देवज्ञ ज्योतिषी आचार्य वराहमिहिर यांनी हे लिहून ठेवलं होतं, त्याच आधारावर हे संकेत देण्यात आले आहेत. त्या ग्रंथाचं नाव 'बृहत्संहिता' ग्रंथ असे आहे. या ग्रंथाच्या श्लोकात लिहिले आहे की, आषाढ महिन्यातील येणारं सूर्यग्रहण पृथ्वीच्या या भागांसाठी हानिकारक ठरू शकते.
ज्योतिषशास्त्र अजूनही वराहमिहिरांच्या तत्त्वांवर आधारित
देवज्ञ ज्योतिषी आचार्य 'वराहमिहिर' चंद्रगुप्त विक्रमादित्यच्या नऊ रत्नांपैकी एक होते आणि त्यांनी सांगितलेली ज्योतिष तत्त्वं आजही पाळली जातात. ज्योतिषशास्त्र आजही त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांवरच आधारित आहे. देश आणि जगातील सर्व ज्योतिषी त्याचे अनुसरण करतात. 6व्या शतकात वराहमिहिर यांनी लिहिलेल्या 'बृहत्संहिता' या ग्रंथाच्या राहुचारा अध्यायातील ७७व्या श्लोकात जे लिहिले आहे, ते चीन व त्याच्या आसपासच्या प्रदेशात राहणा-या लोकांसाठी फारच वाईट आहे. कारण श्लोकानुसार, आषाढ महिन्यात येणारं सूर्यग्रहण हे गांधार (कंधार), पीओके (पुलिंद), काश्मीर प्रदेश (काश्मीर) आणि चीनसाठी विनाशकारी सिद्ध होऊ शकते.
याबाबतची अधिक माहिती देताना काशी येथील ज्योतिषी पंडित पवन त्रिपाठी यांनी सांगितले की, 21 जून रोजी मिथुन राशीवर लागणारं (‘बृहत्संहिता’ शास्त्रानुसार)आषाढ महिन्यातील सूर्यग्रहण या ठिकाणांना मोठे नुकसान पोहोचवू शकते. कारण ग्रहांचा योग हाहाकार माजवणारा आहे. भारताच्या उत्तरेस लागून असलेल्या देशांमध्ये लोक बंड करू शकतात. नैसर्गिक उद्रेक, भूकंप, सैन्य कारवाई किंवा युद्धदेखील होऊ शकते. म्हणजेच भारताच्या उत्तरेकडील सीमा भागात काहीतरी वाईट होणार आहे. अशा घटनांमुळे चीनचा नाश होऊ शकतो, त्यामुळे चीन जे काही करेल त्यानं तो फक्त तोंडावर आपटणार आहे, असंही या अध्यायात सांगण्यात आलं आहे. भारताच्या मध्यवर्ती भूभागावर या सूर्यग्रहणाचा प्रभाव पडणार आहे. संपूर्ण देशात अनागोंदी आणि आगीच्या घटना वाढू शकतात. तसेच सीमाभागात जोरदार युद्धाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा
आरक्षण हा कधीही मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट
चीनमधून बाहेर पडलेल्या कंपन्या भारतात नव्हे, तर मग नेमक्या जातात कुठे?, जाणून घ्या 'सत्य'
...म्हणून भारताच्या बहुप्रतीक्षित ‘मिशन गगनयान’च्या उड्डाणाला विलंब होणार
51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार