चंदीगड : आंतरजातीय विवाह करू इच्छिणारा प्रौढ पुरुष आणि महिलेवर खाप पंचायतने किंवा संस्थेने हल्ले करणे ‘पूर्णपणे बेकायदा’ आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले.आंतरजातीय विवाह करू इच्छिणा-या जोडप्याचे संरक्षण करण्यासाठी सरकार कायदा करणार नसेल, तर आम्हाला मार्गदर्शक सूचना घालून द्याव्या लागतील. प्रौढ त्यांच्या निवडीनुसार लग्न करू शकतात. पंचायत, खाप, व्यक्ती, समाज त्यांना याबद्दल प्रश्न विचारू शकत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले की, खाप किंवा पंचायत, अशा जोडप्यांना बोलावून घेऊ शकत नाही आणि त्यांच्यावर हल्ले करण्यास प्रोत्साहन देऊ शकत नाही.आंतरजातीय विवाह करू इच्छिणाºया जोडप्यांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची शिफारस कायदा आयोगाने केली होती; परंतु सरकार राज्यांची मते गोगलगाईच्या गतीने घेत आहे, असे अॅमिकस राजू रामचंद्रन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
‘इच्छुक आंतरजातीय विवाहितांवरील हल्ले बेकायदा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:29 AM