४० लाखांचे उत्पन्न दाखविणारा मजूर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:01 AM2018-01-31T02:01:45+5:302018-01-31T02:02:00+5:30

सन २०१७-१८ या वर्षासाठी ४० लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र भरणा-या एका बांधकाम मजुरास पोलिसांनी गांजाचा चोरटा व्यापार करण्याच्या आरोपावरून अटक केली.

 Attend the laborer showing the yield of 40 lakhs | ४० लाखांचे उत्पन्न दाखविणारा मजूर अटकेत

४० लाखांचे उत्पन्न दाखविणारा मजूर अटकेत

googlenewsNext

बंगळुरू : सन २०१७-१८ या वर्षासाठी ४० लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र भरणा-या एका बांधकाम मजुरास पोलिसांनी गांजाचा चोरटा व्यापार करण्याच्या आरोपावरून अटक केली.
कोरामंगलम पोलिसांनी अलीकडेच येथील एका हॉटेलवर धाड टाकून रचप्पा रंगा यास अटक करून त्याच्याकडून २८ किलो गांजा
व पाच लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. श्रीनिवास या त्याच्या साथीदारासही पकडण्यात आले. मात्र त्यांना गांजा पुरविणारा साहू मात्र पळून गेला.
रचप्पा रंगा हा १२ वर्षांपूर्वी स्थलांतरित बांधकाम कामगार म्हणून शहरात आला होता. आता तो कनकपुरा येथील एका आलिशान घरात राहतो. त्याच्याकडे महागड्या मोटारीही आहेत. शिवाय गावाकडेही त्याने टोलेजंग घर बांधले आहे. त्याची आतापर्र्यत कोणालाही माहिती नव्हती.
मात्र रचप्पाने प्राप्तिकर विववरणपत्रात ४० लाख रुपयांचे उत्पन्न दाखविल्याने प्राप्तिकर अधिकाºयांना संशय आला व त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाळत ठेवली असता रचप्पा गेली चार वर्षे गांजाचा अवैध व्यापार करीत असल्याचे समोर आले. (वृत्तसंस्था)

Web Title:  Attend the laborer showing the yield of 40 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.