सोलापूरचे अतुल गोतसुर्वे उत्तर कोरियात राजदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:10 AM2018-05-24T00:10:15+5:302018-05-24T00:10:15+5:30
सहा वर्षांनी परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती
प्योंगयँग : उत्तर कोरियात भारताचे राजदूत म्हणून अतुल मल्हारी गोतसुर्वे यांची नियुक्ती झाली असून, तब्बल सहा वर्षांनंतर त्या देशात राजदूत म्हणून परराष्ट्र सेवेतील अधिकाºयाची नेमणूक झाली आहे.
मूळचे सोलापूरचे असलेल्या गोतसुर्वे यांचे शालेय शिक्षण तिथेच झाले, तर पुण्याच्या एमआयटीमधून बीई व सीओईपीमधून एमई केले. पुण्यातूनच त्यांनी एलएलबी पूर्ण केले. काही काळ लेक्चरर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी भारतीय अभियांत्रिकी सेवेत प्रवेश केला. काही वर्षांनी ते परराष्ट्र सेवेत आहे. याआधी भूतान, मेक्सिको तसेच क्युबामध्ये काम केले असून, ते काही काळ पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुखही होते. भारत व उत्तर कोरिया यांच्यातील संबंध सुधारत असताना व काही प्रमाणात व्यापार वाढत असताना, गोतसुर्वे यांची झालेली नेमणूक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
याआधी २0१३ साली परराष्ट्र खात्यातील एका स्टेनोग्राफरला तिथे राजदूत म्हणून पाठवण्यात आले होते, तर त्यानंतर २0१५ साली परराष्ट्र खात्यात चिनी भाषांतराचे काम करणाºया भारतीय अधिकाºयाला उत्तर कोरियात त्या पदी पाठवले होते. (वृत्तसंस्था)