शिर्डी विमानतळास केंद्र सरकारकडून सार्वजनिक वापराचा विमानतळ म्हणून अधिकृत ‘एअरोड्रम’ परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 06:51 AM2017-09-22T06:51:04+5:302017-09-22T06:51:06+5:30
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डी येथील विमानतळास नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गुरुवारी सार्वजनिक वापराचा विमानतळ म्हणून अधिकृत ‘एअरोड्रम’ परवाना जारी केला.
नवी दिल्ली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डी येथील विमानतळास नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गुरुवारी सार्वजनिक वापराचा विमानतळ म्हणून अधिकृत ‘एअरोड्रम’ परवाना जारी केला.
यामुळे देशभरातील भाविकांना लवकरच साईदर्शनासाठी विमानाने जाता येईल. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) शिर्डीजवळ काकडी गावी पूर्णपणे नवा विमानतळ विकसित केला असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सन २०११ मध्ये त्यास तत्त्वत: मंजुरी दिली असून. परवान्यानुसार शिर्डी विमानतळावर फक्त दिवसा विमानांचे उड्डाण करता येईल. या विमानतळाची लांबी २,५०० मीटर लांब असून तेथे एअरबस ए-३२० व बोर्इंग बी-३३७ या जातीची विमाने उतरू शकतील.