हिमस्खलनात पाच जवान शहीद; काश्मीर खोऱ्यात १० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 04:05 AM2020-01-15T04:05:36+5:302020-01-15T04:05:50+5:30
बर्फवृष्टीने जम्मू-श्रीनगर महामार्गावर तीन हजार वाहने अडकली
श्रीनगर : काश्मीर खोºयातील बºयाच भागांत बर्फवृष्टीमुळे जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले असून, सोमवारी रात्री खोºयात तीन ठिकाणी झालेल्या हिमस्खलनात १0 जण मरण पावले आहेत. मृतांमध्ये लष्कराचे चार जवान व बीएसएफचा एक जवान आणि पाच स्थानिक रहिवासीही आहेत. नौगाममध्येही बीएसएफचा एक जवान मरण पावला. त्याच्याबरोबर असलेल्या सहा जवानांची मात्र सुटका करण्यात आली.
माछिल क्षेत्रातील नियंत्रण रेषेपाशी सोमवारी रात्री हिमस्खलनात पाच जवान अडकले होते. त्यापैकी चौघे बर्फाखाली दबून मरण पावले, तर एकाची सुटका करण्यात आली. नौगाम भागातील नियंत्रण रेषेवरील हिमस्खलनात बीएसएफचे सात जवान अडकले होते. त्यापैकी एक जवान मरण पावला, तर सहा जवानांची सुटका करण्यात आली. गंदेरबल जिल्ह्यातही प्रचंड हिमस्खलन झाले. तिथे बर्फाच्या ढिगाºयाखाली ९ जण अडकले होते. त्यापैकी चार जणांची सुटका करण्यात आली. मात्र पाच स्थानिक मरण पावले.
जनजीवन विस्कळीत
काश्मीर खोºयाच्या बºयाच भागांत बर्फवृष्टीबरोबरच जोरदार पाऊसही सुरू आहे. प्रचंड धुके असून, त्याचा परिणाम विमानसेवेवर झाला. जम्मू-श्रीनगर मार्गावर बर्फवृष्टी, पाऊस व धुक्यामुळे तीन हजारांहून अधिक वाहने अडकून पडली आहेत. अनेक भागांत तापमान शून्याखाली आले आहे. मालवाहतूक करणारी वाहने न पोहोचल्याने अन्नधान्ये, भाज्या तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासत आहे. शाळा व महाविद्यालयांना अनेक ठिकाणी सुट्टी दिल आहे. खासगी, सरकारी कार्यालयांमध्येही उपस्थिती अत्यल्प होती. (वृत्तसंस्था)
लातूरचे जवान सुरेश चित्ते सियाचीनमध्ये शहीद
आलमला (जि. लातूर) : औसा तालुक्यातील आलमला येथील जवान सुरेश गोरख चित्ते (३२) हे सियाचीन (जम्मू-काश्मीर) येथे कर्तव्य बजावत असताना मंगळवारी शहीद झाले. हे समजताच औसा तालुक्यावर शोककळा पसरली. सुरेश चित्ते लेह येथील सियाचीन भागात बटालियनमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. २००५मध्ये ते लष्करात भरती झाले. तब्बल १४ वर्षे ते सेवेत होते. वडिलांच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सुरेश यांनी दोन बहिणींचे लग्न केले. भावालाही आधार दिला. त्यांची केवळ १ वर्षे ५ महिने सेवा बाकी होती़ सहा वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.