हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शनिवारचा दिवस अत्यंत कसोटीचा राहिला. अयोध्या वादावरील निर्णय व पश्चिम बंगालमधील चुलबुल वादळावर नजर ठेवणे त्यांना आवश्यक होते. त्यातच कर्तारपूर कॉरिडॉरच्या भारतीय बाजूकडील तपासणी चौकीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. त्यांनी या सगळ्यांचा उत्तम समन्वय साधला.तपासणी चौकीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी सकाळीच पंजाबातील डेरा बाबा नानकला रवाना झाले. डॉ. मनमोहनसिंग आणि इतरांचा समावेश असलेल्या शीख भाविकांच्या जथ्याला रवाना करून ते सायंकाळीच दिल्लीला परतले. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, पंजाबला रवाना होण्यापूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दीर्घ चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला होता. अमृतसरला उतरल्यानंतरही ते अमित शहा यांच्याशी सातत्याने संपर्कात होते.सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादावर निर्णय दिल्यानंतर दुपारी १.00 वा. पंतप्रधानांनी टष्ट्वीटची एक मालिका जारी केली. लोकांचा न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास असल्याचे नमूद करतानाच त्यांनी शांतता व ऐक्याचे आवाहन त्याद्वारे केले. त्यांचे टष्ट्वीट अर्थपूर्ण होते. ‘न्याय मंदिरा’ने अनेक दशके जुन्या खटल्यावर शांततापूर्ण निर्णय दिला. रामभक्त असोत की रहीम भक्त, कोणासाठीही हा निर्णय विजय अथवा पराभव नाही, असे त्यांनी म्हटले. अमित शहा यांनीही टष्ट्वीट करून निर्णयाचे स्वागत केले.सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान दिल्लीबाहेर असताना अमित शहा यांनी त्यांना सातत्याने माहिती पुरविली. दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेश यासह विविध संवेदनशील जिल्ह्यांतील स्थितीची माहिती ते पंतप्रधानांना देत होते. आरएसएसच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, कलम ३७0 आणि राममंदिर यांच्या बाबतीत आपल्या अजेंड्याची अंमलबजावणी केल्याबद्दल संघ परिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कमालीचा कृतज्ञ आहे. हे दोन्ही विषय कित्येक दशके धगधगत होते. मोदी यांनी हिंमत दाखवून ते शांततेने मार्गी लावले. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे त्यासाठीच दिल्लीत तळ ठोकून होते.
ayodhya verdict- पंतप्रधानांची घडमोडींवर करडी नजर; अमित शहा यांच्याशी सतत संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 3:25 AM