नवी दिल्ली -कोरोनाव्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी जग भरातील वैज्ञानिक लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता योग गुरू बाबा रोमदेव यांनी म्हटले आहे, की लोकांनी योग्य काळजी घेतली तर यापासून बचाव केला जाऊ शकतो.
कोरोना व्हायरसला कदापीही घाबरण्याची गरज नाही, केवळ याचा प्रसार आणि लागण होऊ नये यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
रामदेव म्हणाले, गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करा. सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर इतर लोकांपासून चार ते पाच फूट अंतरावर राहा. मास्कचा वापर करा. मी लोकांना विनंती करतो, की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगा करा. याचा अस्थमा हृदय रोग आणि मधुमेहासाठीही चांगला फायदा होईल. ज्यांना या प्रकारचे आजार आहेत त्यांना कोरोनाची लागण होण्याची अधिक भीती असते.