Bakra Eid 2018: देशभरात बकरी ईदचा उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 08:48 AM2018-08-22T08:48:45+5:302018-08-22T09:01:37+5:30
Bakra Eid 2018 देशभरात मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : देशभरात मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. 'ईद उल जुहा' च्या शुभेच्छा. आजच्या दिवशी आपल्या समाजातील सहानुभूती आणि बंधुभावाची भावना वाढू शकेल, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Best wishes on Id-ul-Zuha. May this day deepen the spirit of compassion and brotherhood in our society.
— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2018
मुस्लिम समाजात बकरी ईदला विशेष महत्व आहे. या सणाला 'ईद उल अजहा' किंवा 'ईद उल जुहा' असेही म्हटले जाते. मुस्लमांच्या कालगणेनुसार अरबी महिन्याच्या दहाव्या दिवशी 'बकरी ईद' साजरी केली जाते. याच महिन्यात मुस्लिम लोक हज यात्रेसाठी प्रयाण करतात.
Delhi: People offer prayers at Jama Masjid on #EidAlAdhapic.twitter.com/MvDRKtvJsd
— ANI (@ANI) August 22, 2018
मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बक-याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात या सणासाठी बकरी ईद हे नाव प्रचलित झाले आहे. दरम्यान, बकरी ईदच्या पाश्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Madhya Pradesh: People offer prayers at Idgah ground in Bhopal on #EidAlAdhapic.twitter.com/lWlTN1S4IU
— ANI (@ANI) August 22, 2018